‘चांद्रयान-३’च्या यशामुळे २३ ऑगस्ट आता ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ असणार; पंतप्रधान मोदींची ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांसमोर घोषणा

मी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावर असलो तरी माझे मन फक्त भारतातच होते,असंही म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

बंगळुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ग्रीसहून थेट बंगळुरू येथील इस्रोच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये पोहोचले. येथे त्यांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर  चांद्रयान-3 चे यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना एक मोठी घोषणा केली. August 23 will now be National Space Day due to the success of Chandrayaan 3 PM Modis announcement to ISRO scientists

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ज्या दिवशी चांद्रयान-3 चंद्रावर उतरले ते म्हणजे 23 ऑगस्ट, आता हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाईल. पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रीय अंतराळ दिन तिसर्‍या चंद्र मोहिमेच्या यशाचा उत्सव साजरा करेल.

मोदी बंगळुरू येथील इस्रोच्या टेलीमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये शास्त्रज्ञांना संबोधित करत होते. ते म्हणाले, ‘मी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावर असलो तरी माझे मन फक्त भारतातच होते. कारण ISRO चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगची तयारी करत होते. चांद्रयान-3 च्या यशामागे ज्यांचा हात आहे त्यांना लवकरात लवकर भेटून सलाम करू इच्छित होतो, मी अधीर झालो होतो.

ते म्हणाले की, 23 ऑगस्टला चांद्रयान-3 च्या लँडिंगचा प्रत्येक सेकंद अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून जात आहे. हा नवा भारत आहे, जो तांत्रिकदृष्ट्या आणि नव्या पद्धतीने विचार करतो. हाच भारत आहे जो अंधाऱ्या भागातही जातो आणि प्रकाश पसरवून जगाला प्रकाशित करतो. मोदी म्हणाले की, चांद्रयान-3 च्या यशावर जगभरात भारताच्या वैज्ञानिक कामगिरीची जोरदार चर्चा होत आहे.

August 23 will now be National Space Day due to the success of Chandrayaan 3 PM Modis announcement to ISRO scientists

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात