उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त केला आहे.
विशेष प्रतिनिधी
गंगनानी :उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली आहे. बसमध्ये एकूण 33 भाविक होते. ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी २० जण सुखरूप बचावले आहेत. उर्वरित भाविकांचा शोध सुरू आहे. Uttarakhand A bus full of 33 devotees fell into a valley seven died
प्राप्त माहितीनुसार, त्रिमूर्ती ट्रॅव्हल्सची बस गंगोत्री धाम येथून ३३ प्रवाशांना घेऊन परतत होती. दरम्यान गंगनानीजवळ क्रॉस बॅरियर तोडत बस दरीत कोसळली. दरम्यान, काही झाडे आणि ढिगाऱ्यांच्या साहाय्याने बस नदीच्या काठावर थांबली. यानंतर प्रवाशांच्या किंकाळ्या सुरू झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त केला आहे. यासोबतच प्रशासनाला मदत आणि बचाव कार्य लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेवर त्यांनी एक ट्विट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App