‘चांद्रयान-3’ने गाठला महत्त्वपूर्ण टप्पा; लँडर ‘विक्रम’ अवकाशयानापासून यशस्वीरित्या वेगळे!

यासोबतच आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे…

विशेष प्रतिनिधी

श्रीहरीकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम चांद्रयान ३ ने आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. लँडर विक्रम अवकाशयानापासून यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले आहे. इस्रोनुसार – आता 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.45 वाजता लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करेल.यापूर्वी चांद्रयान 3 ने पाचव्या आणि अंतिम कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला होता. Chandrayaan 3 reaches an important milestone Lander Vikram successfully separated from spacecraft

लँडिंगनंतर, सहा चाकी रोव्हर लँडरमधून बाहेर येईल, जो तेथे एका चंद्र दिवसासाठी म्हणजेच पृथ्वीच्या 14 दिवसांसाठी प्रयोग करेल. यासोबतच आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे भारताचे चांद्रयान 3 आणि रशियाचे लुना-25 यापैकी कोणते मिशन चंद्रावर प्रथम उतरणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

प्रोपल्शनपासून वेगळे केल्यानंतर, लँडरची प्राथमिक तपासणी केली जाईल. इस्रोचे म्हणणे आहे की लँडरमध्ये चार मुख्य थ्रस्टर्स आहेत ज्यामुळे ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास सक्षम होतील. इतर सेन्सर्सची देखील चाचणी केली जाईल.

Chandrayaan 3 reaches an important milestone Lander Vikram successfully separated from spacecraft

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात