वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह वादात नवा ट्विस्ट आला आहे. वाराणसीतील ज्ञानवापीप्रमाणेच शाही इदगाहचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले आहेत. श्री कृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका (SLP) दाखल केली आहे. यामध्ये वैज्ञानिक सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व विभागाची टीम म्हणजेच ASI ज्ञानवापीमध्ये सर्वेक्षण करत आहे.A petition was filed in the Supreme Court, demanding a survey in Mathura’s Shahi Eidgah like Gyanvapi
श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे प्रतिनिधित्व आशुतोष पांडे करत आहेत. सिद्धपीठ माता शाकुंभरी पीठाधीश्वर भागुवंशीचेही ते अध्यक्ष आहेत. त्यांनीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अशा बांधकामाला मशीद मानता येणार नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. शिवाय, 1968 च्या कराराच्या वैधतेच्या विरोधात युक्तिवाद करून याला फसवणूक म्हटले गेले आहे.
शाही मशीद इदगाह व्यवस्थापन समितीकडून नुकसान
याचिकाकर्ते भागुवंशी आशुतोष पांडे यांनी आरोप केला की, शाही मशीद इदगाह व्यवस्थापन समितीसारख्या संस्था मालमत्तेचे नुकसान करण्यात गुंतल्या आहेत. मंदिराचे खांब आणि प्रतिकांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला. जनरेटरचा वापर केल्यामुळे भिंती आणि खांबांचे अधिक नुकसान झाले आहे, असेही म्हटले आहे.
याचिकाकर्त्याने नमाज आणि परिसरात होत असलेल्या इतर धार्मिक बाबींवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. जमिनीची अधिकृतपणे ‘इदगाह’ नावाने नोंदणी करता येणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे. कारण, त्याचा कर ‘कटरा केशव देव, मथुरा’ या नावाने वसूल केला जात आहे.
ऐतिहासिक महत्त्वासाठी सर्वेक्षण करावे
सर्वोच्च न्यायालयाचे वकील सार्थक चतुर्वेदी यांनी ही याचिका दाखल केली आहे. वादग्रस्त जमिनीची ओळख, जागा आणि मोजमाप याची सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. दोन्ही बाजूंनी केलेल्या दाव्यांना पुष्टी देण्यासाठी वैज्ञानिक सर्वेक्षणाची गरज आहे. याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले की, ही विनंती ज्ञानवापी येथे सुरू असलेल्या ASI सर्वेक्षणातून प्रेरित आहे. या स्थळाचे ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रीय महत्त्व पाहणीतून जाणून घ्यायचे आहे.
अमीन सर्वेक्षणाच्या आदेशाला दिली होती स्थगिती
यापूर्वी न्यायालयाने शाही ईदगाहमध्ये अमीन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, नंतर न्यायालयाच्या उच्च खंडपीठाने याला स्थगिती दिली. सध्या जन्मभूमी आणि शाही ईदगाह वादाशी संबंधित प्रकरणे उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. दुसरीकडे, श्री कृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टने ही याचिका दाखल केली आहे. ही ट्रस्ट काही महिन्यांपूर्वीच स्थापन झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App