विशेष प्रतिनिधी
मुंबई : 6 डिसेंबर 1992 रोजीच्या बाबरी मशीद पतनाचे खापर शरद पवारांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या डोक्यावर फोडले आहे. वरिष्ठ पत्रकार निरजा चौधरी यांनी लिहिलेल्या “हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड” या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पवार बोलत होते. यावेळी पवारांनी 1992 च्या घटनाक्रमाचा आपल्या दृष्टीने उहापोह केला. Sharad pawar blamed it on narasimha rao for babri masjid demolition
बाबरी मशिदीच्या ढाच्याला काहीही होणार नाही, असे आश्वासन भाजपच्या नेत्या विजयाराजे सिंधिया यांनी नरसिंह राव यांना आपल्या समोर दिले होते. परंतु आपण त्यांना विजयाराजे यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका, असे सांगितले होते. परंतु नरसिंह राव यांनी विजयाराजे यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवला आणि कोणतीही कारवाई केली नाही म्हणून बाबरी मशीद पडली, अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी नरसिंह राव यांच्या डोक्यावर बाबरी मशीद पतनाचे खापर फोडले.
पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान, माजी रेल्वेमंत्री आणि भाजपचे नेते दिनेश त्रिवेदी, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई हजर होते.
या कार्यक्रमात शरद पवारांनी नरसिंह राव यांच्या डोक्यावर बाबरी मशीद पतनाचे खापर फोडताना काही तपशील दिले. पवार म्हणाले, की मी त्यावेळी संरक्षण मंत्री असताना “कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेयर्सचा” सदस्य होतो. त्यावेळी भाजपच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांनी नरसिंह राव यांना बाबरी मशिदीला काहीही होणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यावेळी मी, गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि गृहसचिव माधव गोडबोले यांनी विजयाराजे सिंधिया यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका, असे नरसिंह राव यांना सांगितले होते. पण त्यांनी विजयाराजे यांच्यावरच विश्वास ठेवला, असा दावा पवारांनी केला.
बाबरी मशिदीच्या संदर्भात मला भाजपचे राजकारण संपवायचे होते. भाजपच्या हातून तो मुद्दा कायमचा काढून घ्यायचा होता, असे नरसिंह राव यांनी 6 डिसेंबर 1992 नंतर काही निवडक पत्रकारांना सांगितल्याचे निरजा चौधरी यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सांगितले.
नरसिंह राव यांच्या चरित्रात काय म्हटलेय??
मात्र, बाबरी मशीद पतना संदर्भात नरसिंह राव यांच्या अधिकृत चरित्रात विनय सीतापती यांनी संशोधनाअंती नरसिंह राव यांच्या बाकी सर्व सहकाऱ्यांचे दावे खोटे ठरविले आहेत. “हाफ लायन : हाऊ नरसिंह राव ट्रान्सफॉर्म्ड इंडिया” हे चरित्र विनय सीतापती यांनी लिहिले आहे. यात त्यांनी बाबरी मशीद पतना संदर्भात काही तथ्य नोंदवली आहेत. 6 डिसेंबर 1992 पूर्वी नरसिंह राव यांच्या एकाही सहकार्याने त्यांना कल्याण सिंग यांचे सरकार बरखास्त करा, असा सल्ला दिला नव्हता, असे सीतापती यांनी स्पष्टपणे चरित्रात नोंदविले आहे.
नरसिंह राव यांना हटविण्याचा डाव होता
त्याचबरोबर एक महत्त्वाचे राजकीय तथ्य त्यांनी या चरित्रात समोर आणले आहे, ते म्हणजे नरसिंह राव यांच्या विरोधात काँग्रेस पक्षांतर्गतच एक मोठा गट कार्यरत होता आणि बाबरी मशीद पडो अथवा न पडो नरसिंह राव यांना पंतप्रधान पदावरून हटविण्याचा चंग या गटाने बांधला होता, याकडे विनय सीतापती यांनी आवर्जून लक्ष वेधले आहे. नरसिंह राव विरोधी गटात त्यावेळी अर्जुन सिंग, शरद पवार नारायण दत्त तिवारी अशा दिग्गज नेत्यांचा समावेश होता, ही वस्तुस्थिती देखील सीतापती यांनी नोंदविली आहे.
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पडली त्यापूर्वी नोव्हेंबर 1992 या महिन्यात “कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेअर्सच्या” पाच बैठका झाल्या होत्या. पण यापैकी एकाही बैठकीत नरसिंह राव यांच्या कोणत्याही सहकार्याने बाबरी मशिदीला धोका आहे म्हणून कल्याण सिंह यांचे सरकार बरखास्त करा, असा सल्ला दिला नव्हता, हे तथ्य विनय सीतापती यांनी नरसिंह राव यांच्या चरित्रात अधोरेखित केले आहे.
दिवंगत व्यक्तीवर आरोप, दिवंगत व्यक्तीचाच हवाला!!
शरद पवारांनी नरसिंह राव यांच्यावर बाबरी मशीद पतनाचे खापर फोडताना एकतर ते दिवंगत झाल्यानंतर आरोप केला आहे आणि त्याचवेळी विजयाराजे सिंधिया यांच्यासारख्या दिवंगत व्यक्तीचाच हवाला दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी नमूद केलेली नावे गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि गृहसचिव माधव गोडबोले हे देखील आज हयात नाहीत. त्यामुळे पवारांनी सांगितलेल्या सर्व बाबींमधील तथ्ये या व्यक्ती आता सांगू शकत नाहीत, ही बाब अधोरेखित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App