म्हणे, भारतमातेची हत्या; राहुल गांधींचे लोकसभेतले भाषण हा औचित्यभंग आणि कायद्याच्या कचाट्यात अडकणारे!!

राहुल गांधींनी आज लोकसभेत अविश्वास ठरावावर भाषण करताना भारतमातेच्या हत्येचे जे उद्गार काढले, तो केवळ संसदीय कामकाजातला औचित्यभंग नव्हता, तर ते कायद्याच्या कचाट्यात अडकणारे भाषण ठरले आहे. राहुल गांधींवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आपल्या अधिकारात विशेष कारवाई करण्याच्या बेतात असल्याची माहिती समोर आली आहे. Rahul Gandhi’s speech in loksabha not only breach of privilege, but also breach of relem of law!!

अविश्वास ठरावावर भाषण करताना राहुल गांधींनी सुरुवातीला “अध्यात्मिक” भाषण केले. भारत जोडो यात्रेत चालताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातले दुःख आपल्या डोळ्यात आले. शेतकऱ्यांच्या हृदयातले दुःख आपल्या हृदयात आले. आठ वर्षांच्या मुलीने एक चिठ्ठी लिहून आपल्याला शक्ती दिली. त्यामुळे आपण 131 दिवस 3000 किलोमीटर चालू शकलो, वगैरे गोष्टी त्यांनी लोकसभेत सांगितल्या. पण त्यानंतर ते क्राइम पेट्रोल स्टाईलने भारतमातेच्या हत्येचा आरोप करून बसले आणि हाच नेमका औचित्यभंग ठरला. इतकेच नाही, तर भारतमातेच्या हत्येची बात करून राहुल गांधी कायद्याच्या कचाट्यात देखील अडकले!!

पहिल्यांदाच असा आरोप

आजपर्यंत देशात अनेक वादविवाद झाले. दंगे धोपे झाले. त्यावरून संसद आणि विधिमंडळात मोठे गदारोळ देखील झाले. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले. हमरीतुमरीवर आले. त्यांनी सदनात मारामाऱ्या देखील केल्या. पण आजपर्यंत एकाही आमदार अथवा खासदाराने थेट भारतमातेची हत्या झाल्याचा आरोप कधीच केला नव्हता. तो आरोप पहिल्यांदा राहुल गांधींच्या रूपाने एका खासदाराने लोकसभेत केला. राहुल गांधींचे हे भाषण लोकसभेच्या रेकॉर्डवर आले आहे.

राहुल गांधींचे हे कोणत्या पक्षाच्या जाहीर सभेतले, मेळाव्यातले भाषण अथवा खाजगी संभाषण नव्हते, तर लोकसभेसारख्या पवित्र सभागृहातले आणि सरकार वरील अविश्वास ठराव यासारख्या गंभीर संसदीय व्यवहारातले ते भाषण होते. त्यामुळे राहुल गांधींनी भारतमातेचा हत्येचा बेछूट आरोप करून त्याचे संसदीय व्यवहारातले गांभीर्य तर घालवलेच, पण त्यांनी संसदेत काय बोलावे आणि काय बोलू नये याचा औचित्यभंगही केला.

पण औचित्यभंगा पलिकडे देखील राहुल गांधींच्या भाषणात कायद्याच्या कचाट्यात अडकणारा मुद्दा ठरला, तो म्हणजे कोणत्याही हत्येचा आरोप हा संसदेच्या पटलावर पुराव्यांखेरीज करणे. तसेच भारतमाता या पवित्र पण अमूर्त संकल्पनेवर एक प्रकारचा दोषारोप लावणे हा होय.

कोट्यावधी भारतीयांच्या मनात भारतमाता वंदनीय, पूजनीय आहे. आपल्या भूमीला माता मानणारा भारत हा पृथ्वीच्या पाठीवर एकमेव देश आहे. पण 140 कोटी भारतीयांच्या या भावनेची राहुल गांधींनी कदर न करता बिनदिक्कतपणे भारतमातेचा हत्येचा आरोप करून टाकला. त्यांचे हे भाषण संसदेच्या परंपरा, पद्धती आणि नियमावलीच्या बाहेरचे ठरले आहे.

संसदेत कोणते शब्द वापरावेत आणि वापरू नयेत, याची विशिष्ट नियमावली आहे. त्यात वेळोवेळी शब्द वगळता येतात आणि नव्याने समाविष्ट केले जातात. पण “भारतमातेची हत्या” अशा स्वरूपाचे शब्द संसदेत उच्चारले जातील, असे संसदीय धुरिणांना कधी वाटलेच नव्हते. त्यामुळे तो शब्द त्यांनी संसदीय नियमावलीत घातलाय किंवा कसे??, याविषयीची माहिती लोकसभा सचिवालय घेत असल्याची बातमी समोर येत आहे.

राहुल गांधींचे भाषण घटनात्मक चौकटीची सुसंगत आहे का??, याची देखील तपासणी होत आहे. राहुल गांधींचे भाषण कायद्याच्या कसोटीवर जर ते उतरले नाही, तर राहुल गांधींवर संसदीय नियमावलीनुसार पुन्हा एकदा कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. यात औचित्यभंगासह घटनेची चौकट ओलांडण्याचाही आरोप त्यांच्यावर होऊ शकतो.

 खासदारकीवर पुन्हा संकट

देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्यानंतर राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा झाली. ती शिक्षा पूर्णपणे माफ झालेली नाही, तर तिला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधींची आधी नियमानुसार गेलेली खासदारकी पुन्हा बहाल होऊ शकली. खासदारकी बहाल झाल्यानंतर काल मंगळवारी राहुल गांधी लोकसभेत आले, पण मोदी सरकारवरच्या अविश्वास ठरावावर आज बुधवारी बोलले आणि थेट भारतमातेच्या हत्येचा आरोप करून बसले. त्यामुळे राहुल गांधींवर पुन्हा एकदा नियमानुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Rahul Gandhi’s speech in loksabha not only breach of privilege, but also breach of relem of law!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात