70000 कोटींचा भ्रष्टाचार ते सावरकर विरोधकांच्या मांडीवर ठाकरे बसले; मोदींवरच्या अविश्वास ठरावात ठाकरे – शिंदेंचे खासदार एकमेकांना भिडले!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केसावरकर विरोधकांच्या मांडीवर जाऊन बसले मोदींवरच्या अविश्वास ठराव ठाकरे – शिंदेंचे खासदार एकमेकांना भिडले, असे आज लोकसभेत घडले. 70000 crores of corruption to Savarkar, Thackeray sat on the lap of opponents

लोकसभेत काँग्रेसने मोदी सरकार विरुद्ध आणलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा सुरू झाली. या चर्चेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि शिंदे गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भाग घेतला. त्यावेळी या दोन्ही खासदारांनी एकमेकांच्या पक्षांचे जोरदार वाभाडे काढले. अरविंद सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी भ्रष्टाचारावर बोलतात घराणेशाहीवर बोलतात.

पण सिंचन घोटाळ्यात 70000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी ज्यांच्यावर केला त्यांनाच आज त्यांनी आपल्या ओढले आणि त्यांना मंत्री केले. आता पंतप्रधान कोणत्या तोंडाने भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतील??, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांना देवळात घंटा बनवणार आहे हिंदू नको होता, तर आक्रमक हिंदू हवा होता, याची आठवण अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना करून दिली

शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. “युपीए” नावाची लाज वाटली म्हणून ते नाव टाकून दिले आणि “इंडिया” आघाडी हे नाव धारण केले. पण म्हणून जुनी पापे लपत नाहीत. त्याचे हिशेब द्यावेच लागतील, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांचे वाभाडे काढले. ज्या काँग्रेसने सावरकरांचा अपमान आणि विरोध केला, त्या सावरकर विरोधकांच्या मांडीवरच तुमचे नेते जाऊन बसले, असे श्रीकांत शिंदे यांनी अरविंद सावंत यांना सुनावले.

काँग्रेसने मोदी सरकार विरोधात आणलेल्या या अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावर शिवसेनेचे दोन गट एकमेकांविरुद्ध भिडले, हे चित्र आज लोकसभेत पाहायला मिळाले.

70000 crores of corruption to Savarkar, Thackeray sat on the lap of opponents

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात