जाणून घ्या नेमकं काय आहे कारण आणि का घ्यावा लागाल असा कठोर निर्णय?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्यसभेत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खासदार डेरेक ओब्रायन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभा सदस्य म्हणून असभ्य वर्तन केल्याबद्दल त्यांना चालू संसदेच्या उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. Shock to INDIA Trinamool Congress MP Derek OBrien suspended from the Rajya Sabha for the entire session
सभागृहाचे नेते पीयूष गोयल यांनी सभागृहाच्या कामकाजात सतत अडथळा आणणे, अध्यक्षांची अवज्ञा करणे आणि सभागृहात गोंधळ निर्माण केल्याबद्दल त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता.
राज्यसभेत हे प्रकरण सभापती जगदीप धनखड आणि डेरेक ओब्रायन यांच्यात जोरदार वादावादीपर्यंत पोहोचले. यादरम्यान पॉइंट ऑफ ऑर्डर पासून चर्चा सुरू झाली. धनखड यांनी विचारले तुमचा मुद्दा काय आहे? यानंतर बोलता बोलता डेरेक इतके संतापले की, त्यांनी अध्यक्षांच्या खुर्चीकडे बघून आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, आम्हाला मणिपूरवर चर्चा हवी आहे. सत्ताधारी पक्ष चर्चेला तयार असल्याचे सांगतात, पण ते आम्हाला हवी तशा प्रकारे चर्चा करू इच्छित नाहीत. डेरेकच्या या आराडओरडीवरून सभापतीही संतपाले. त्यांनी डेरेक यांना ताकीद दिली आणि बसायला सांगितले, पण यावरही डेरेक शांत बसले नाहीत, अखेर अध्यक्षांनी उभे राहून डेरेक यांना त्याच्या असभ्यतेबद्दल फटकारले आणि नंतर त्यांना उर्वरित अधिवेशन काळासाठी निलंबित केले.
याआधीही ब्रायन यांना अध्यक्षांनी इशारा दिला होता. तुम्ही सभापतींना आव्हान देत आहात, हे योग्य नाही, असे सभापती म्हणाले होते. सभापतींनी विरोधी खासदारांना शांततेचे आवाहन केले होते, मात्र तरीही खासदारांचा गदारोळ सुरूच राहिला आणि अखेर कामकाज तहकूब करावे लागले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App