विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राचा महासिनेमा म्हणून ओळखला जाणारा बाई पण भारी देवा या सिनेमाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळालं. आणि या सिनेमातील प्रत्येक गोष्ट तितकीच फेमस झाली . Actress Rohini hattangadi new cinema.
या सिनेमाची सगळ्यात महत्त्वाची आणि जमेची बाजू ठरली की या सिनेमाची स्टार कास्ट. मराठीतील दिग्गज अभिनेत्रींनी या सिनेमात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
यामध्ये ज्येष्ठ बहिणीची भूमिका करणाऱ्या रोहिणी हट्टींगडी यांची भूमिका विशेष गाजली. मोजकेच डायलॉग मात्र एका डिप्रेशन मध्ये गेलेल्या स्त्रीची भूमिका त्यांनी साकारली होती.
आता बाईपण भारी देवा सिनेमानंतर रोहीणी हट्टंगडीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे आता वेळ झाली. ‘आता वेळ झाली’ या मराठी चित्रपटाची कथा अशाच एका खऱ्या घटनेवर आधारित असून हा चित्रपट यंदाच्या हिवाळ्यात प्रदर्शित होत आहे.
खऱ्या आयुष्यातील घटनांवर आधारीतहा चित्रपट खऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखांवर आणि त्यांच्या अनुभवावर बेतलेला आहे. चित्रपटाची कथा खिळवून ठेवणारी, काहीशी गमतीदार आणि तरीही भावनात्मक आहे. दोन जीवांची ही कथा प्रेरक साहसी आहे आणि तरीही ती अस्तित्वाबद्दल चक्रावून टाकणारे प्रश्न निर्माण करणारीसुद्धा आहे. त्यांचा हा प्रवास एक हवाहवासा सिनेमॅटीक अनुभव देवून जातो. दिनेश बन्सल (इमॅजीन एंटरटेन्मेट अँड मिडिया प्रायव्हेट लिमिटेड), अनंत महादेवन (अनंत महादेवन फिल्म्स), जी के अगरवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयवंत वाडकर, अभिनव पाटेकर हे इतर कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
आता वेळ झाली’ हा आत्तापर्यंत कित्येक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवडला गेला आहे. डल्लास इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजस्थान इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शक) आणि लोकप्रिय जागरण फिल्म फेस्टिव्हल यांचा त्यात समावेश आहे.प्रदीप खानविलकर यांनी चित्रपटाचे छायाचित्रण केले असून कुश त्रिपाठी, अनंत नारायण महादेवन यांनी त्याचे संकलन केले आहे. सिंक साऊड अँड साउंड डिझाईन हे भगत सिंग राठोड यांचे असून पार्श्वसंगीत संजय चौधरी यांचे आहे. अपर्णा शाह यांनी रंगपटाची जबाबदारी घेतली असून महेंद्र पाटील यांनी मराठी रूपांतरण केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App