वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काश्मिरी दहशतवादी यासिन मलिक शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात हजर झाला. त्याला कोर्टात पाहून न्यायाधीश संतापले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, आम्ही असा कोणताही आदेश दिलेला नाही, ज्यामध्ये त्याला वैयक्तिकरीत्या न्यायालयात हजर राहावे लागेल. याप्रकरणी व्हर्च्युअल सुनावणी होणार आहे.Judges angry at Yasin Malik in Supreme Court; Were not asked to appear in person, the hearing will be virtual
टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरल्यानंतर यासीन तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. जम्मू न्यायालयाच्या आदेशाविरोधात सीबीआयने केलेल्या अपिलावर सुनावणीसाठी यासिनला आज सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात आले.
या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी सुनावणीतून स्वत:ची माघार घेतली
यासीनच्या खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी या खटल्यातून स्वतःची माघार घेतली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, हे प्रकरण चार आठवड्यांनंतर सुनावणीसाठी घेण्यात येईल. त्यावर दुसऱ्या खंडपीठामार्फत सुनावणी होईल, न्यायमूर्ती दत्ता त्याचे सदस्य नसतील.
ते म्हणाले, यासीनला काही बोलायचे असेल तर तो व्हर्च्युअली कनेक्ट होईल. त्याला न्यायालयात हजर केले जाणार नाही.
यासीनकडून काश्मिरात दहशतवादी हल्ल्यांसाठी फंडिंग
यासिन मलिकला एनआयए कोर्टाने 2022 मध्ये टेरर फंडिंग प्रकरण, यूएपीए आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यासीनला अनेक प्रकरणांत शिक्षा झाली. दोन प्रकरणांमध्ये जन्मठेपेची तर इतर प्रकरणांमध्ये 10 वर्षांची शिक्षा. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत.
पाकिस्तानच्या पाठिंब्याने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांसाठी निधी पुरवणे आणि दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवणे यासंबंधी यासीनवर अनेक गुन्हे दाखल आहेत.
श्रीनगरमध्ये हवाई दलाच्या जवानांवर केला होता हल्ला
25 जानेवारी 1990 रोजी श्रीनगरमध्ये हवाई दलाच्या जवानांवर हल्ला केल्याचा आरोप मलिकवर आहे. या घटनेत 40 जण जखमी झाले होते, तर चार जवान शहीद झाले होते. स्क्वाड्रन लीडर रवी खन्ना हे त्यापैकीच एक होते. हे सर्वजण विमानतळावर जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत होते, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. मलिकने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीतही याचा उल्लेख केला होता
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App