विशेष प्रतिनिधी
गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजितदादा गट बळकट होत असताना दुसरीकडे शरद पवारही शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे मेळावे आयोजित करून पक्ष संघटनेत जान फुंकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यात शरद पवार एक मोठा डाव खेळत आहेत, तो म्हणजे अजितदादा सोडून इतर बंडखोर नेत्यांवर पवार घाव घालत आहेत.Sharad pawar avoiding direct conflict with ajit pawar, instead he is hitting bhujbal, patel and other rebels
पवारांनी आपल्या दौऱ्याची सुरुवातच छगन भुजबळांच्या येवल्यातून केली आणि आता ते प्रफुल्ल पटेलांच्या गोंदियात जाऊन पटेल समर्थकांच्या राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. या सगळ्यात पवार बारामती दौरा मात्र टाळत आहेत.
स्वतः अजित दादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी देखील दोन वेळा पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन भेट घेतली. त्या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या आणि सगळ्यात शेवटी पवारांना “इंडिया”च्या बैठकीत नव्हे, एनडीएच्या बैठकीत नेण्याचे घाटत होते असे उघड झाले.
पण या सर्व राजकीय घडामोडींमध्ये पवार मात्र अजितदादा सोडून इतर बंडखोर नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये दौरा काढत आहेत. यातून पवार कुटुंबीयांमध्ये फूट पडली असे दाखवायचे नाही. स्वतःचे कुटूंब राखायचे, हाच त्यांचा प्रयत्न आहे.
मध्यंतरी रोहित पवारांनी देखील या संदर्भातले एक वक्तव्य केले होते. बारामतीतून अजित पवारांची राष्ट्रवादी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही आणि विधानसभेची निवडणूकही अजितदादाच लढवतील, असे ते म्हणाले होते. एकूण पवारांच्या राजकीय हालचाली आणि रोहित पवारांचे वक्तव्य यात राजकीय सुसंगती दिसते आहे. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचे काय व्हायचे ते होवो, बारामतीत पवार कुटुंबीयांमध्ये फूट पडता कामा नये हाच तो डाव आहे.
पवारांचे एकेकाळचे निकटचे सहकारी रंजन तावरे यांनी हा डाव मध्यंतरी उलगडून दाखवला होता. अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडली असे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात तसे नाही काका पुतण्या आतून एकच आहेत. बारामतीत पवार कुटुंबात फूट पडलेली नाही. सरते शेवटी ते एकत्र येणारच आहेत. गेल्या 40 वर्षांमधला पवार कुटुंबीयांबरोबरचा माझा परिचय आणि अनुभव आहे त्यावरून मी हे सांगतो, असे रंजन तावडे म्हणाले होते.
या राजकीय पार्श्वभूमीवर पवार आता प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदियाचा दौरा करणार आहेत. आधी त्यांनी छगन भुजबळ यांचा येवला दौरा केला आणि आता ते प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदियात जाणार आहेत. त्यानंतर देखील पवार इतर बंडखोर आमदाराने मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरा करून शरदनिष्ठ राष्ट्रवादी बळकट करणार आहेत.
गोंदियामध्ये येत्या 28 जुलै रोजी शरद पवार गटाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला शरद पवार गटाचे कोणते नेते उपस्थित राहणार आहेत, हे अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या गोंदियात शरद पवार गटाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव वीरेंद्र जायस्वाल हे करत आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला असलेल्या गोंदिया जिल्हाकडे सर्वाचं लक्ष लागले होते. गोंदियामधून शरद पवार यांना कोण पाठिंबा देणार??, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सुरुवातीला वीरेंद्र जायस्वाल यांनी देखील अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. मात्र ते आता पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे आले आहेत.
– लवकरच जिल्हा कार्यकारिणीची घोषणा
28 जुलैला गोंदियातील मध्ये राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात येईल, या मेळाव्यात कोणते नेते सहभागी होणार आहेत, याबाबत लवकरच माहिती दिली जाईल अशी माहिती वीरेंद्र जयस्वाल यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App