विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार काल सिल्वर ओक वर भेटून गेल्यानंतर शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष वाढीसाठी 1999 चा फॉर्म्युला पुन्हा राबवण्याचे ठरवले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये घेतलेल्या बैठकीत आपल्याशी निष्ठावान असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना 1999 चा फॉर्मुला अवलंबून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अर्थातच अनेकांच्या भुवया उंचावल्या असून पवारांच्या या नव्या आदेशामुळे काँग्रेस फुटीचा पुन्हा एकदा धोका उत्पन्न झाला आहे का?? असा सवाल अनेकांच्या मनात आला आहे. हा सवाल मनात येण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा इतिहास दडला आहे.Sharad pawar loyal NCP may split Congress again in maharashtra
1999 चा फॉर्म्युला म्हणजे शरद पवारांनी काँग्रेस मधून बाहेर पडून किंवा त्यांना काँग्रेस मधून बाहेर काढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताना महाराष्ट्रातली काँग्रेस फोडली होती. महाराष्ट्रातल्या अखंड काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पदाधिकारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टप्प्याटप्प्याने सामील झाले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व काँग्रेस फोडून निर्माण झाले होते.
शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताना बाकीचे पक्ष फोडले. पण त्याला मर्यादा होती त्यांनी प्रामुख्याने काँग्रेस मधूनच आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नेते आणि पदाधिकारी घेऊन त्यांचे राजकीय भरण पोषण केले.
2 जुलै 2023 पर्यंत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अखंड अस्तित्वात होती. अजित पवारांनी याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली त्यानंतर बारामतीच्या कऱ्हेतून बरेच राजकीय पाणी वाहून गेले आहे आणि शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशा दोन राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राच्या राजकारणात उभ्या राहताना दिसत आहेत. अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे पक्ष वाढीचे प्रयत्न शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस मधून जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी आपल्या बाजूने वळवण्याचा वळविण्याचे आहेत, तर शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष वाढीचे प्रयत्न पवारांच्या आदेशानुसार 1999 च्या फॉर्म्युलात दडले आहेत.
1999 चा फॉर्म्युला म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे काँग्रेस पक्षातले लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात खेचून घेणे हा होय. त्यामुळे आता शरदनिष्ठ राष्ट्रवादी जर 1999 च्या फॉर्म्युला नुसार पक्ष वाढ करणार असेल, तर सध्या महाराष्ट्रात असलेल्या काँग्रेसला नव्याने फुटीचा धोका उत्पन्न झाल्याचे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App