प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ मंत्रालयाचे सूत्रे आज हाती घेतल्यानंतर अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 आमदारांना शरदनिष्ठ राष्ट्रवादीने कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अजितदादा शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओक वर दाखल झाले आहेत. Ajitdada filed on Silver Oak
अर्थात या भेटीमागे काही कौटुंबिक पार्श्वभूमी आहे शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया होत असून त्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. अजितदादा या निमित्ताने शरद पवारांची भेट घेण्यासाठी तिथे पोहोचल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
अजितनिष्ठ 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आज त्यांचे खाते वाटप करण्यात आले. यामध्ये अजितदादांकडे अर्थ आणि नियोजन, तर दिलीप कोळसे पाटील यांच्याकडे सहकार खाते तसेच धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते सोपविण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा खाते सोपविले आहे.
‘’अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केल्याचे का कळवले नाही?’’; शरद पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल!
हे खाते वाटप होऊन या मंत्र्यांनी कारभार स्वीकारताच त्यांना शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसने आपण पक्ष का सोडला??, आपल्याला निलंबित का करण्यात येऊ नये?? आपली आमदारकी रद्द का करू नये?? अशा आशयाच्या कायदेशीर नोटीसा धाडल्या आहेत.
या राजकीय पार्श्वभूमीवर तसेच प्रतिभा पवार यांच्या शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अजितदादा सिल्वर ओकवर दाखल होऊन ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बरोबर चर्चा करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App