प्रतिनिधी
बीड : भाजपने माझ्या 2019 च्या पराभवानंतर मला अनेकदा डावलले, तरी मी पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली नाही. भाजप सोडून मी कुठेही जाणार नाही, असा स्पष्ट खुलासा पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.express his displeasure, he will not go anywhere except BJP; Clear disclosure by Pankaja Munde
पंकजा मुंडे म्हणाल्या
मी आज पत्रकार परिषद बोलवली कारण मला शेकडो कॉल आले. २०१९ मध्ये माझा पराभव झाला. त्यानंतर अनेक निर्णय झाले. मी त्यात सामील नसले, मला तिकिट मिळाले नाही म्हणून मी नाराज असेन म्हणून पक्षाबाहेर जाणार अशा चर्चा झाल्या.
मी जाहीर कार्यक्रमात भूमिका मांडली आहे.
सातत्याने मी स्पष्टीकरण दिले तरी माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.
मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही. मला पक्षाने अनेकदा डावललं तरी मी नाराजी व्यक्त केली नाही. पक्षाचा आदेश मी कायमच अंतिम मानला.
मला काही पक्षांकडून ऑफर आहेत. पण माझे करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा?? तुम्ही प्रश्नचिन्ह लावून बातम्या देता. मी गेली 20 वर्ष राजकारणात काम करतेय. काही चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जात आहेत.
पंकजा मुंडे पात्र की अपात्र हे पक्ष ठरवेल, मी कसं सांगू?? मी भाजपा सोडून कुठे जाणार नाही. वेगवेगळ्या पक्षांकडून मला पक्षात घ्यायला आवडेल, अशा प्रतिक्रिया आल्या.
परवा एक बातमी आली की मी सोनिया गांधी – राहुल गांधी यांची भेट घेतली. एखाद्याचे करियर संपवण्याचा हा डाव आहे. मी काँग्रेसच्या वाटेवर आहे, अशा बातम्या दिल्या. माध्यमांवर जबाबदारी आहे. ज्याने ही बातमी दिली, त्यांच्या विरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.
माझे करियर २० वर्षांचे आहे. माझे जनसामन्यांचे नेतृत्व आहे. ज्या चॅनलने काँग्रेस नेत्यांची भेट घेतली ही बातमी दिली. त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार. त्यांच्याकडे पुरावे मागणार आहे.
माझे करिअर हे कवडीमोलाचे नाही. मी लोकांशी थेट संवाद साधते. माझ्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. पाठीत खंजीर खुपसण्याचे माझ्यावर संस्कार नाहीत.
दरवेळी पंकजा मुंडे यांचे नाव येते व मला तिथे स्थान मिळत नाही. या बाबत माझ्या पक्षाला विचारावे लागेल. जेव्हा माझे नाव चालले, मी कधीही टिप्पणी केली नाही- माझ्या भाषणाचे तुकडे काढले होते. तेवढेच दाखवले जाते. भागवत कराड यांना संधी दिली. त्यानंतर मीच त्यांच्या यात्रेला भगवा झेंडा दाखवला.
https://youtu.be/mVe1q4p-DNg
मला दोनवेळा फॉर्म भरायला सांगितला-
पण नंतर तो भरू नका असे सांगण्यात आले. पण मी जो आपकी आज्ञा म्हणत पक्षाचे आदेश ऐकले.
राजकारणात येण्याचे माझे मूळ काय? पंडीत दीनदयाळ यांचे विचार माझ्याकडे आहे-
पक्ष हे माझ्यासाठी सर्वात प्रथम आहे.
सर्वात प्रथम सत्ता आणि नंतर संघटन असे माझ्या रक्तात नाही. अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. मी फक्त मुद्द्यावर बोलतेय.
अनेक लोक प्रशासन व उद्योग सोडून मोदींकडे पाहून राजकारणात आले. चारित्र्यसंपन्न नेते त्यांनी घडवावे असे लोकांना वाटते.
मी ईश्वर साक्ष वागते. मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी पक्ष प्रवेशासाठी भेटलेले नाही. मी राहुल गांधी व सोनिया गांधींना कधीच प्रत्यक्ष भेटलेले नाही. मी नाराज नाही पण दुःखी आहे.
बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी राहिली नाही असे लोक बोलतात.
पण दीनदयाळ उपाध्याय यांचा भाजप सदैव राहो यासाठी मी प्रयत्न करत राहणार. लपून छपून काम करणे मला जमत नाही. मला जे काही करायचे असेल ते मी डंके ती चोट पर करेल. हा पक्ष संपला-
ही सत्ता उलथवून टाकली यातच सगळे सुरु आहे. लोकांचे काय?? मी २० वर्षांत एकदाही सुट्टी घेतली नाही. आता मी महिनाभर सुट्टी घेतेय. अंतर्मुख होऊन स्वतः ला पाहायचे आहे. मला माझा मार्ग तपासायचा आहे. सध्याच्या राजकारणाचा मला कंटाळा आलाय. २ महिने सुट्टी घेणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App