प्रतिनिधी
बीड : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे अस्वस्थ झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध खुलासे केले. भाजप माझ्या रक्तात आहे. सोनिया गांधी राहुल गांधींशी माझी कधीही भेट झालेली नाही. पण आता या बातम्या आल्यामुळे मी व्यथित आहे. आता मी एक – दोन महिन्यांच्या ब्रेक वर जाणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.BJP in my blood, Sonia – no meeting with Rahul Gandhi, will go on a break for one-two months; Disclosure by Pankaja Munde
पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडलेले मुद्दे असे :
2019 मध्ये मी भाजपची उमेदवार होते, त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. मात्र, त्या नंतर अनेक वेळा मला संधी दिली गेली नाही, अशा बातम्या झाल्या. मात्र, मला स्वत:ला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. अनेकांनी मला ऑफर दिल्याच्या बातम्या आल्या, त्याकडेही मी गांभीर्याने पाहिले नाही. असे म्हणत माझे राजकीय करिअर संपवण्याचा डाव आखला जातोय. पण कुणाच्या पाठीत खंजीर खुपसणे माझ्या रक्तात नाही.
राहुल गांधी यांना प्रत्यक्षात समोरा-समोर मी आजपर्यंत पाहिलेही नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मी भेटले नाही. मी लपून छपून काम करत नाही. मी कोणताही निर्णय मी लपून घेत नाही, जो निर्णय घेईन तो उघडपणे घेईन.
काही माध्यमांनी माझ्या बाबत खोटी माहिती दाखवली. मी शपथेवर सांगते की, मी गांधी परिवारला वैयक्तिक ओळखतही नाही. त्यामुळे चूकीची माहिती देणाऱ्या माध्यमांविरोधात मी खटला दाखल करणार आहे.
ब्रेकवर जाण्याचा निर्णय
पुढील एक ते दोन महिने मी ब्रेक घेणार आहे. तसेच अंतर्मुख होऊन विचार करणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. माझ्या पक्षाला माझ्या बद्दल सन्मान वाटला असेल, माझ्यासाठी पक्षाचा निर्णय अंतिम असेल असेही त्यांनी सांगितले.
ब्रेक के बाद निर्णय काय??
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असून त्या लवकरच पक्षांतर करतील, अशा चर्चा रंगल्या होत्या. या संदर्भात राज्यात नव्याने दाखल झालेल्या बीआरएस पक्षाने त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, तर पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये आल्या तर आम्हाला आनंदच होईल, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले होते. तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी देखील काँग्रेस पक्ष पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, या सर्व शक्यता त्यांनी फेटाळल्या.
पण आता पंकजा मुंडे यांनी स्वतःहून एक – दोन महिने ब्रेकवर जाण्याचे जाहीर केल्याने ब्रेक के बाद निर्णय काय??, या विषयीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App