वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : शिख फॉर जस्टिस (SFJ) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा कुख्यात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा अमेरिकेत एका रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पन्नूच्या कारला यूएस हायवे 101 वर अपघात झाला. मात्र, ही माहिती सूत्रांकडून मिळाली असून, याला कोणत्याही बाजूने अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्याचबरोबर सोशल मीडियावर असाही दावा केला जात आहे की, पन्नू याच्या मृत्यूची बातमी ही अफवा आहे. तो लवकरच दिसून येईल.Death of Khalistani Terrorist Pannu; US car accident death claim; After the killing of Khalistani, the underground took place
पन्नू काही काळ भूमिगत होता. लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून त्याने मोबाईलही बंद केला होता. पाकिस्तानात परमजीत सिंग पंजवाड आणि कॅनडात हरदीप सिंग निज्जर आणि यूकेमध्ये अवतार सिंग खांडा यांच्या हत्येनंतर पन्नूला आपलीही हत्या होण्याची भीती होती.
अमेरिकेत बसून द्यायचा धमक्या
पन्नू हा मूळचा अमृतसरमधील खानकोट गावचा रहिवासी होता. तो परदेशात गेला होता. तिथे पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या सांगण्यावरून खलिस्तानी योजना पूर्ण करण्यात गुंतलेला होता. अमेरिकेशिवाय इंग्लंड आणि कॅनडात त्याने आपल्या संघटनेच्या माध्यमातून भारतविरोधी प्रचार चालू ठेवला होता. तो खलिस्तानच्या मागणीच्या नावाखाली व्हिडिओ जारी करून पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. भारतीय एजन्सींची बदनामी करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा.
अलीकडेच खलिस्तान समर्थकांच्या हत्येनंतर त्याने कॅनडा आणि अमेरिकेतील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत एक व्हिडिओही जारी केला होता. हा त्याचा शेवटचा धमकीचा व्हिडिओ होता.
पन्नू कुख्यात दहशतवाद्यांच्या संपर्कात होता
पन्नू यूकेस्थित बब्बर खालसा इंटरनॅशनलचा परमजीत सिंग पम्मा, कॅनडास्थित केटीएफचा प्रमुख हरदीप सिंग निज्जर आणि इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशनचे मलकित सिंग फौजी यांच्या संपर्कात होता.
तो पंजाबमधील गुंडांना आणि तरुणांना वेगळ्या खलिस्तान देशासाठी लढण्यासाठी भडकावत होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याला दहशतवादी घोषित केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App