भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी साधला निशाणा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील तीन दिवसांपासून नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. तीन दिवसांपूर्वी मोठा राजकीय महाभूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाबंडखोरी झाली. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या ३० पेक्षा अधिक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. एवढचं नाहीतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि अन्य आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आज मुंबईत दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचा म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाचा स्वतंत्र मेळावा पार पडला. यामध्ये शरद पवारांनी भाजपावर निशाणा साधला. BJP spokesperson Keshav Upadhye criticized Sharad Pawar
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी शरद पवारांना उद्देशून १) २०१४ ला स्वतःहून भाजपाला का पाठिंबा दिला?, २) देवेंद्र फडणवीसांच्या २०१४ च्या शपथविधीला तुमच्या नेत्यांना का पाठवलं? ३) २०१७ साली तुमचे नेते वाटाघाटीला वर्षावर का पाठवले? ४) २०१९ साली सत्ता स्थापनेसाठी ५ बैठका का घ्यायला लावल्या? ५) पहाटे पहाटे अजितदादांना भाजपासोबत शपथ का घ्यायला लावली? ६) शिवसेनेतील बंडावेळी भाजपाला पाठिंब्याचं पत्र का तयार ठेवलं? असे प्रश्न विचारले आहेत.
भाजपाचे हिंदुत्व मनुवादी होतं, तर…@PawarSpeaks साहेब, खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील का? १) २०१४ ला स्वतःहून भाजपाला का पाठिंबा दिला? २) मा. देवेंद्रजींच्या २०१४ च्या शपथविधीला तुमच्या नेत्यांना का पाठवलं? ३) २०१७ साली तुमचे नेते वाटाघाटीला वर्षावर का पाठवले? ४) २०१९ साली… — Keshav Upadhye (Modi Ka Pariwar) (@keshavupadhye) July 5, 2023
भाजपाचे हिंदुत्व मनुवादी होतं, तर…@PawarSpeaks साहेब, खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील का?
१) २०१४ ला स्वतःहून भाजपाला का पाठिंबा दिला?
२) मा. देवेंद्रजींच्या २०१४ च्या शपथविधीला तुमच्या नेत्यांना का पाठवलं?
३) २०१७ साली तुमचे नेते वाटाघाटीला वर्षावर का पाठवले?
४) २०१९ साली…
— Keshav Upadhye (Modi Ka Pariwar) (@keshavupadhye) July 5, 2023
याशिवाय, ‘’महाविकास आघाडाची अवस्था बांडगुळासारखी झाली आहे. एकमेकांचा जीवनरस शोषून जिवंत राहण्यासाठी धडपडताना तीनही बांडगुळे नष्ट होणार आहेत. आपण एकमेकांच्या आधाराने जगायचे आहे की जगण्यासाठी दुसऱ्याला संपवायचे आहे हे कळले नाही की बांडगुळे आपोआप संपतात हा निसर्गाचा नियमच आहे.’’ अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App