साहेब, गुगली टाकून आपल्याच माणसाची विकेट घेता!!; वसंतदादांचे अश्रू ते गुगली; पवारांचीच “विकेट” भुजबळांनी काढली!!

प्रतिनिधी

मुंबई : वसंतदादांचे अश्रू ते अजितदादांचा गुगली; पवारांचीच विकेट भुजबळांनी काढली!!, अशी घटना आज अजितनिष्ठ राष्ट्रवादीच्या मेळाव्यात घडली. साहेब, तुम्ही भाजपला गुगली टाकल्याचे म्हणता, पण आपल्याच माणसाची विकेट घेता!!, अशा शब्दांत छगन भुजबळांनी शरद पवारांच्या फोडाफोडीच्या राजकारणाचे वाभाडे काढले. NCP splits : chagan bhujbal targets sharad pawar over his double game politics

छगन भुजबळ यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी केली. यात त्यांनी शरद पवारांनाही सोडले नाही. शरद पवारांच्या प्रत्येक निर्णयावर भुजबळांनी जोरदार शरसंधान साधले नागालँड मध्ये भाजपच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे 7 मंत्री चालतात. त्यांचे तुम्ही सत्कार करता, मग आम्हालाच भाजपबरोबर जाण्याची का परवानगी देत नाही??, आम्हालाही भाजपबरोबर जाण्याची परवानगी द्या. आमचेही सत्कार करा, असे भावनिक गुरुवार छगन भुजबळ यांनी काढले.

पण त्याचवेळी छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या राजकारणातल्या फोडाफोडीचे वाभाडेल काढले. साहेब, तुम्ही वसंतदादांना सोडलेत, तेव्हा वसंतदादांचे डोळ्यात अश्रू आले. मला शिवसेनेतून फोडले तेव्हा बाळासाहेब आणि मा साहेबांच्या डोळ्यात अश्रू आले. धनंजय मुंडे यांना फोडले तेव्हा गोपीनाथ मुंडे यांच्या डोळ्यात अश्रू आले. आज आम्ही भाजपबरोबर गेलो म्हणून तुम्हाला वाईट वाटत असेल तुमच्या डोळ्यात अश्रू आले असतील. पण वसंतदादा, बाळासाहेब आणि गोपीनाथरावांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला दिसले नाहीत का??, असा परखड सवाल छगन भुजबळ यांनी केला.

आत्तापर्यंत भाजपचे नेते प्रखरपणे शरद पवारांच्या फोडाफोडीच्या राजकारणाचे वाभाडे काढत होते त्याच स्टाईलने त्यांचे शिष्य म्हणावणाऱ्या छगन भुजबळांनी पवारांच्या त्याच फोडाफोडीचा राजकारणाचे तितकेच प्रखर वाभाडे काढले.

पवारांभोवतीचे बडवे

छगन भुजबळांच्या भाषणात पूर्णपणे शिवसेना स्टाईल दिसली. बाळासाहेबांना बडव्यांनी घेरले म्हणून राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ सगळे बाहेर पडले. आज शरद पवारांना त्यांच्याभोवतीच्या बडव्यांनी घेरले आहे. त्यामुळे आम्हाला बाहेर पडावे लागले असा टोलाही छगन भुजबळांनी शरद पवारांना लगावला. शरद पवारांनी वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या नियुक्ता केल्या नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.

*शरद पवारांच्या दुटप्पी राजकारणावरही भुजबळांनी शरसंधान साधले. देवेंद्र फडणवीस सरकार मध्ये जायला नको म्हणून तुम्ही अजितदादांना रोखले. भाजपला गुगली टाकल्याचे म्हणालात. पण साहेब, तुम्ही आपल्याच माणसाची विकेट काढली”, अशा शब्दांत शरद पवारांच्या राजकारणाचा त्यांनी समाचार घेतला. तुम्ही दिल्लीत एक बोलता मुंबईत दुसरेच करता, असे का?? आम्हाला अंधारात ठेवून का राजकारण करता?? त्याचे कारण काय??, हे सगळ्या महाराष्ट्राला कळले पाहिजे. कारण आम्ही तुम्हाला नेता मानतो तुम्ही आमचे गुरु आहात. पण तुमच्या भोवती जे बडवे तुम्हाला घेरून बसलेत, ते तुम्ही बाजूला करा. तुमच्या भोवतीचा धूर बाजूला करा आणि मोकळेपणाने आम्हाला पोटाशी धरा, असे भावनिक उद्गार काढून छगन भुजबळ यांनी आपले भाषण संपविले.

भुजबळांच्या या भाषणात त्यांनी आत्तापर्यंतच्या पवारांच्या फोडाफोडीच्या राजकारणाची सगळी भडास बाहेर काढली, हेच त्यांच्या आजच्या भाषणाचे वैशिष्ट्य होते!!

NCP splits : chagan bhujbal targets sharad pawar over his double game politics

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात