“नितीश कुमारांनी भाजपाच्या दारात नाक जरी घासलं तरी…” सुशील मोदींचं वक्तव्य!

बिहारमध्येही बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे,  असंही म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

पाटणा : महाराष्ट्रानंतर आता बिहारच्या राजकारणातही उलथापालथ झाली आहे. महाराष्ट्रासारखे बिहारमध्ये राजकीय संकट आल्यास भारतीय जनता पक्ष (भाजप) मुख्यमंत्री नितीशकुमार यांना कोणत्याही किंमतीत आपल्या गटात घेणार नाही, मग भलेही ते भाजपाच्या दरवाज्यावर नाक जरी रगडत असले तरी, असे भाजपा खासदार सुशील मोदी यांनी सोमवारी सांगितले. Nitish Kumar will never be admitted to BJP Sushil Modi

एएनआयशी बोलताना बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी म्हणाले, “अमित शाह यांनी आधीच स्पष्टपणे सांगितले आहे की ते नितीश कुमारांना कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाहीत,  मग भलेही नितीश कुमारांनी भाजपाच्या दारात नाक घासले तरीही. आम्ही १७ वर्षे नितीश कुमारांना सांभाळलं, मात्र आता भाजपा त्यांना स्वीकारणार नाही आणि भविष्यातही पुढे नेणार नाही.’’

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी म्हणाले की, “बिहारमध्येही बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे कारण गेल्या 17 वर्षांत नितीश कुमार यांनी आपल्या आमदार आणि खासदारांना भेटण्यासाठी एक मिनिटही वेळ दिला नाही. त्यांना प्रतीक्षा करावी लागली. आता प्रत्येकाला अर्धा- एक तास वेळ दिला जात आहे..”

Nitish Kumar will never be admitted to BJP Sushil Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात