महत्त्वाची बातमी : या बातमीकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हीही होऊ शकता ‘ऑनलाईन फ्रॉड’चे शिकार

 तुमचा जरासाही बेजबाबदारपणा तुमच्या मोठ्या नुकसानास आणि बदनामीसही कारणीभूत ठरू शकतो!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आजकाल डिजिटल युगात सर्व कामे ऑनलाईन आणि चुटकीसरशी होत आहेत. शिवाय, जगभरातील कशाच्याही संदर्भातील माहिती फक्त एका क्लिकर मिळत आहे. यामुळे संपूर्ण जगच ऑनलाईन झालं आहे. या ऑनलाईन सुविधांचे जेवढे फायदे आहेत, तेवढंच यामुळे कधीकधी मोठं नुकसानही होतं.  अशावेळी नागरिकांनी जबाबदारपणे ऑनलाईन कामं करावीत. कधीकधी आपला जरासा बेजबाबदारपणा आपले मोठे आर्थिक नुकसान आणि बदनामीसही कारणीभूत ठरतो. त्यामुळे अशा ऑनलाईन फ्रॉडचा शिकार होण्यापासून स्वत:ला वाचवायचे असेल, तर खालील महत्त्वपूर्ण सूचना कायम लक्षात ठेवल्या पाहिजे. How to protect yourself from online fraud

कोणीही ऑनलाइन लोन घेऊ नये,  कोणीही अनोळखी व्हाट्सअप व्हिडिओ कॉल स्वीकारू नये. अश्लील लिंक, अनोळखी लिंक ओपन करू नये. Sextortion चा धोका असू शकतो,  लाईट बिल रात्री कट होईल, असे खोटे मेसेजेस ब्लॉक करावे. फेसबुक प्रोफाईल लॉक करावे. घरातले फोटो व्हिडिओ त्यात टाकू नये फक्त आपले मित्र आपले फोटो व्हिडिओ बघू शकतील असे करावे. आपले पासवर्ड डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड नंबर सगळे एका रजिस्टर मध्ये घरी लिहून ठेवावे. क्विक सपोर्ट, टीम viewer , एनी डेस्क मोबाईल ॲप डाऊनलोड करू नये.

याचबरोबर,  ऑनलाइन फ्रॉड झाल्यास तात्काळ सकाळी दहा ते सहाच्या दरम्यान 1930 वर फोन करून माहिती द्यावी,  WWW. cybercrime.gov.in मेल पाठवावा. कोणीही बँकेतून बोलत असेल तर विश्वास ठेवू नये. आपली डेबिट कार्ड क्रेडिट कार्डची केवायसी माहिती देऊ नये स्वतः बँकेत जाऊन संपर्क साधावा.  कोणत्याही ॲपला allow करू नये; deny करावे. ऑनलाइन डिलिव्हरी ॲप वर आपली माहिती सेव्ह करून ठेवू नये, ऑर्डर देत असताना कॅश ऑन डिलिव्हरी करावे.  एकसारखा पासवर्ड प्रत्येकास देऊ नये ,सोपा पासवर्ड ठेवू नये, घरी पासवर्ड लिहून ठेवावे दर तीन महिन्यास पासवर्ड बदलावा.

याशिवाय, डेबिट क्रेडिट कार्डच्या मागे पासवर्ड लिहून ठेवू नये, मागील तीन अंकी cvv नंबर झाकून टाकावा. एटीएम मशीन मध्ये पैसे काढत असताना स्वॅप मशीन बघावे, पासवर्ड झाकून टाकावा. मित्रांचा इंस्टाग्राम हॅक करून आपणास पैसै गुंतवणुकीचा फ्रॉड मॅसेज येणार. मित्रांच्या लिंक ला open करून त्यात आपला ईमेल आयडी टाकू नये. मोबाईल मधील ॲप जास्त महिने वापरला नसेल डिलीट करावे. वर्तमान पत्रामधील घरबसल्या कामाच्या जाहिराती फसवणुकीच्या असतात, काम हवे असल्यास स्वतः त्या ऑफिस मध्ये जावून चौकशी करावी.

फेसबुक, इंस्टाग्राम, Google, OLX वरील वस्तु बघून विकत घेऊ नये. अनोळखी लोकांना फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारू नये.  काही व्यक्ती आपणास स्वतः हून आपल्या बँक अकाऊंट मध्ये पैसे पाठवुन फसवणुक करतात. त्यांना परत त्यांच्या IFSC code व फक्त बँकेचा अकाऊंट विचारूनच पैसे ट्रान्स्फर करावे. एकवेळेस पोलीसांना भेटुनच पुढील कार्यवाही करावी. थर्ड पार्टी UPI वापरण्यापेक्षा म्हणजे गूगल पे, फोन पे, पेटीम वापरण्यापेक्षा फक्त बँकेचे QR code वापरून पैश्यांची देवाण घेवाण करावी,  मोबाईलमध्ये घरातील फोटो, व्हिडिओ ठेवु नये, ते सर्व पेन ड्राईव्ह मध्ये ट्रान्स्फर करावे, मोबाईल मध्ये आपले महत्वाचे पासवर्ड, डॉक्युमेंट काहीच ठेवु नये. फेसबुक,इंस्टाग्राम वरील आपले प्रोफाईल एडिट करून only friend करावे, public, friends of friend करू नये.

How to protect yourself from online fraud

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात