पाटण्याच्या विरोधी ऐक्यात राहुल “देवदास”!!

वृत्तसंस्था

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या दौऱ्यावर असताना इकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटण्यात बोलावलेल्या बैठकीला काँग्रेस सह सर्व महत्त्वाच्या विरोधी पक्षांचे नेते जमले आहेत. पण पाटण्याच्या या विरोधी ऐक्यात राहुल गांधी मात्र “देवदास” बनले आहेत.Rahul Devdas in anti-Patna unity

राहुल गांधींच्या “देवदास”ची भाजपने खिल्ली उडवली आहे. पाटण्यातच भाजपच्या कार्यालयाबाहेर विरोधी ऐक्याची खिल्ली उडवताना राहुल गांधी हे सर्व विरोधी पक्षांचे “देवदास” आहेत, अशी पोस्टर्स लागली आहेत.



देवदास मध्ये सिनेमात शाहरुख खानने देवदास ची भूमिका केली होती त्यात त्याच्या तोंडी डायलॉग आहेत, बाबूजी ने कहा गाव छोड दो, पारो ने कहा शराब छोड दो म, एक दिन सब कहेंगे देवदास तुम दुनिया ही छोड दो, तसेच डायलॉग राहुल गांधींच्या तोंडी या पोस्टरवर दाखवले आहेत. केजरीवालने कहा दिल्ली – पंजाब छोड दो, लालू – नितीशने कहा बिहार छोड दो, ममता ने कहा बंगाल छोड दो, एक दिन सब कहेंगे राहुल तुम राजनीतीही छोड दो!!, या पोस्टर मधून भाजपने विरोधी ऐक्याची खिल्ली उडवली आहे.

विरोधी पक्षांच्या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, शरद पवार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आदी नेते पाटण्यात पोहोचले आहेत. विमानतळावर जाऊन नितीश कुमार यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींचे स्वागत केले. बाकीच्या नेत्यांच्या स्वागताला नीतीश कुमार यांनी आपले दुसऱ्या फळीतले नेते पाठवले.

पण या विरोधी ऐक्याच्या बैठकीपूर्वी राहुल गांधींच्या “देवदास” पोस्टरची पाटण्यासह सर्व देशभर चर्चा आहे.

Rahul Devdas in anti-Patna unity

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात