पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वचस्तरातून कौतुक होत आहे.
विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या राज्य दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यात पीएम मोदींनी अनेक सेलिब्रिटींच्या भेटी घेतल्या. मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी जिल बायडेन यांचीही भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. PM Modi stood up in honor of the national anthem at the Washington airport
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी जेव्हा वॉशिंग्टन डीसीला पोहोचले तेव्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. जॉइंट बेस अँड्र्यूज विमानतळावर पाऊस आणि जोरदार वारा असताना पंतप्रधान मोदींचे औपचारिक स्वागत करण्यात आले. स्वागत समारंभात भारताचे राष्ट्रगीत वाजविण्यात आले. यादरम्यान असे काही घडले ज्यासाठी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले जात आहे.
https://youtu.be/gibqdEvm0-M
प्रत्यक्षात मोदी विमानतळावर पोहोचताच जोरदार पाऊस सुरू झाला. पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी दोन्ही देशांचे राष्ट्रगीतही वाजवण्यात आले. राष्ट्रगीत सुरू असताना जोरदार पाऊस पडत होता. राष्ट्रगीताच्या सन्मानाने विमानतळावर उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पंतप्रधान मोदीही तिथे उभे राहिले. मोदी पावसात भिजत होते, पण राष्ट्रगीताला मान देण्यासाठी ते तसेच उभे राहिले.
जेव्हा पंतप्रधान वॉशिंग्टन डीसीला पोहोचले तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘’भारतीय समुदायाच्या जल्लोषामुळे आणि भगवान इंद्राच्या कृपेने ही भेट अधिक खास बनली आहे.’’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App