Manipur Violence : अमित शाह यांनी मणिपूर हिंसाचार संदर्भात बोलावली सर्वपक्षीय बैठक

विशेष प्रतिनिधी

विरोधी पक्ष सर्वपक्षीय बैठकीची सातत्याने मागणी करत होते.

नवी दिल्ली :  मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने 24 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी (21 जून) अधिकृत हँडलवरून ट्विट करून बैठकीची माहिती दिली. Union Home Minister Amit Shah has convened an all party meeting in New Delhi to discuss the situation in Manipur

ट्विटमध्ये म्हटले आहे की, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी 24 जून रोजी दुपारी 3 वाजता नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.” मणिपूरमध्ये जवळपास 50 दिवसांपासून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंसाचाराच्या घटना थांबत नाहीत.

मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष सरकारकडे सर्वपक्षीय बैठकीची मागणी करत होते. 16 जून रोजी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ट्विट करून केंद्रावर निशाणा साधला होता की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे कारण देश उत्तरांची मागणी करत आहे.

यापूर्वी 15 जून रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मणिपूरमधील परिस्थितीवर ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींवर मौन पाळल्याचा आरोप केला आणि मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Union Home Minister Amit Shah has convened an all party meeting in New Delhi to discuss the situation in Manipur

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात