वृत्तसंस्था
होंडुरास : होंडुरासमधील महिला तुरुंगात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी कारागृहात 41 महिला कैद्यांचा मृत्यू झाला. बेकायदेशीर कारवायांवरून दोन टोळ्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात कैद्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.Gangwar in US Honduras Prison; 41 women prisoners died in firing and arson
होंडुरासच्या राष्ट्रीय पोलीस तपास संस्थेचे प्रवक्ते युरी मोरा यांनी या संपूर्ण घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बहुतेकांचा जळाल्याने मृत्यू झाला आहे. युरी मोराने सांगितले की, काहींना गोळ्याही लागल्या आहेत.
होंडुरासच्या राष्ट्रीय पोलिस तपास संस्थेचे प्रवक्ते युरी मोरा यांनी सांगितले की, पीडितांपैकी 26 जणांना जाळून मारण्यात आले आणि काहींना गोळ्या घालण्यात आल्याचे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, ही घटना होंडुरासची राजधानी टेगुसिगाल्पाच्या वायव्येस सुमारे 30 मैल (50 किलोमीटर) तामारा तुरुंगात घडली. गंभीर जखमी झालेल्या महिला कैद्यांवर तेगुसिगाल्पा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशाच्या तुरुंग यंत्रणेच्या प्रमुख ज्युलिसा विलानुएवा यांनी या संपूर्ण घटनेवर दुःख व्यक्त केले असून दंगलीत सहभागी असलेल्या संघटित टोळीवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. कारागृहातील बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी कठोर प्रयत्न सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळेच हा संघर्ष झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App