गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार, सन्मानपत्र आणि एक कोटी रुपयांची रक्कम जाहीर झाली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने गोरखपूरमधील गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार, सन्मानपत्र आणि एक कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली आहे. गीता एक्सप्रेसला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही घोषणा करण्यात आली आहे. यानंतर पंतप्रधान मोदींपासून ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून गीता प्रेसचे अभिनंदन केले. मात्र काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून यावर टीका करत विरोध दर्शवला, त्यांना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. Politics on Gita Press Himanta Biswa got angry at Jairam Rameshs criticism
जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘’२०२१चा गांधी शांतता पुरस्कार गोरखपूर येथील गीता प्रेसला प्रदान करण्यात आला आहे, जे यावर्षी शताब्दी साजरे करत आहे. अक्षय मुकुल यांचे या संस्थेचे २०१५ चे उत्कृष्ट चरित्र आहे, ज्यामध्ये त्यांनी महात्मासोबतचे वादळी नाते आणि त्यांच्या राजकीय, धार्मिक आणि सामाजिक अजेंड्यावर त्यांच्याशी सुरू असलेल्या संघर्षांचा मागोवा घेतला आहे. हा निवाडा खरोखरच फसवणूक करणारा आहे आणि सावरकर आणि गोडसे यांना पुरस्कार देण्यासारखे आहे.’’
अशाप्रकारे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या मुद्द्यावरून राजकारण सुरू केले आहे, ज्यावर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. या संपूर्ण प्रकरणावर जयराम रमेश यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, ‘’कर्नाटकातील निवडणूक विजयाचा अहंकार बाळगून काँग्रेस आता उघडपणे भारतीय संस्कृतीवर आघात करत आहे. धर्मांतरविरोधी कायदा रद्द करणे असो किंवा गीता प्रेसवर टीका करणे असो; काँग्रेसचे असे प्रयत्न भारतीय नागरिक दुप्पट जोमाने हाणून पाडतील. त्यांनी हे ट्विट हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये केले आहे, जेणेकरून प्रत्येकाला त्याचे मत कळू शकेल.
कर्नाटक में मिली चुनावी जीत के घमंड में चूर होकर कांग्रेस अब भारतीय संस्कृति पर खुला प्रहार कर रही है। वह चाहे धर्मांतरण विरोधी कानून को रद्द करना हो या फिर गीता प्रेस की आलोचना करना; भारत की जनता निश्चित रूप से दोगुनी शक्ति के साथ कांग्रेस के ऐसे प्रयासों को नाकाम करेगी। https://t.co/pIximIAZhY — Himanta Biswa Sarma (Modi Ka Parivar) (@himantabiswa) June 19, 2023
कर्नाटक में मिली चुनावी जीत के घमंड में चूर होकर कांग्रेस अब भारतीय संस्कृति पर खुला प्रहार कर रही है।
वह चाहे धर्मांतरण विरोधी कानून को रद्द करना हो या फिर गीता प्रेस की आलोचना करना; भारत की जनता निश्चित रूप से दोगुनी शक्ति के साथ कांग्रेस के ऐसे प्रयासों को नाकाम करेगी। https://t.co/pIximIAZhY
— Himanta Biswa Sarma (Modi Ka Parivar) (@himantabiswa) June 19, 2023
दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर राजकारण सुरू झाल्यानंतर गीता एक्स्प्रेसने एक कोटी रुपयांची रक्कम घेणार नसून केवळ प्रशस्तीपत्र घेणार असल्याचे जाहीर केले आहे. गीता एक्स्प्रेसला गांधी शांतता पुरस्कार देण्याच्या घोषणेनंतर हे राजकारण सुरू झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App