आर्यभट्ट कॉलेजच्या गेटसमोर घडली थरारक घटना
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याची कॉलेजबाहेर भोसकून हत्या करण्यात आली. दक्षिण कॅम्पस येथील आर्य भट्ट कॉलेजच्या गेटवर रविवारी दुपारी एका विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. A student was stabbed to death in broad daylight in South Campus of Delhi University
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना या घटनेबाबत चरक पालिका रुग्णालयातून पीसीआर कॉल आला होता. फोन करणाऱ्याने पोलिसांना सांगितले होते की, एका जखमी विद्यार्थ्याला त्याच्या हॉस्पिटलमध्ये आणले होते, त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. मात्र, उपचारादरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा रुग्णालयात पोहोचला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृत्यू झालेला विद्यार्थी पश्चिम विहार येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. निखिल चौहान असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय निखिल हा बीए (ऑनर्स) पॉलिटिकल सायन्स स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. सुमारे सात दिवसांपूर्वी कॉलेजमधील स्कूल ऑफ ओपन लर्निंगच्या विद्यार्थ्याने निखिलच्या मैत्रिणीसोबत गैरवर्तन केले होते.
पोलिसांनी सांगितले की, रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपी निखिलला त्याच्या तीन साथीदारांसह कॉलेजच्या गेटबाहेर भेटले. यादरम्यान त्याने निखिलच्या छातीवर वार केले. हल्ल्यात जखमी झाल्याने निखिलला चरक पालिका रुग्णालयात नेण्यात आले. तरीही त्याला वाचवता आले नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App