प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे कायमचे बसणार पक्षप्रमुख पदाच्या खुर्चीवर, पक्षाला मात्र लागली घरघर कारण शिशिर शिंदे आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे जाणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर!! असे घडणार आहे.Shishir Shinde, Manisha Kayande will go with the Shinde group
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त वरळीत होणाऱ्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना कायमचे शिवसेना पक्षप्रमुख पद अधिकृत ठरावाद्वारे देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांची पक्षावर घट्ट पकड असल्याचे यातून दाखविले जाणार आहे. पण त्याच वेळी त्यांच्या शिवसेनेला मात्र घरघर लागली आहे. कारण माजी आमदार शिशिर शिंदे आणि सध्याच्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिशिर शिंदे यांनी शिवसेना सोडण्याचे कारण चार वर्षे घरात रिकामा बसून होतो. आपल्याला कोणते कामच दिले नाही असे सांगितले आहे.
मनिषा कायंदे कालपर्यंत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या होत्या. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्या ठाकरे गटाची बाजू जोरकसपणे मांडत होत्या. पण शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा राजकीय मुहूर्त साधत त्यांनी देखील एकनाथ शिंदे गटाची वाट धरली आहे. यावर संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आदळापट केली आहे. शिवसेनेत वाटेल त्याला प्रवेश दिले गेले. त्यांना मोराचे पिसारे लावले आणि तेच पिसारे घेऊन ते इकडे तिकडे नाचत आहेत, अशा शब्दात राऊत यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर सोडून जाणाऱ्यांवर आगपाखड केली.
पण एकीकडे उद्धव ठाकरे कायमस्वरूपी शिवसेनेचे पक्षप्रमुख होत असताना त्यांचा पक्षावरचा पकड का सैलावत आहे??, या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App