वृत्तसंस्था
बेंगलोर : कर्नाटकात काँग्रेस सरकार आल्याबरोबर काँग्रेसने आश्वासन दिल्यानुसार 200 युनिट वीज मोफत दिली. पण त्यापुढे लगेच मोठी दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला भेटीस धरले, इतकेच नाहीतर औद्योगिक विजेची दरवाढ दीडपट केली. त्यामुळे आता कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आंदोलनाच्या पवित्र्यात आली असून येथे 22 जून रोजी संघटनेने बंद पुकारला आहे.Free electricity on one hand, tariff hike on the other; Karnataka Chamber of Commerce in a posture of agitation; Closed on June 22!!
कर्नाटक चैंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज (KCC&I) ने बिजली शुल्कों में असामान्य मूल्य वृद्धि के विरोध में 22 जून को कर्नाटक बंद का आह्वान किया है: KCC&I pic.twitter.com/RfHpNms8mX — ANI_HindiNews (@AHindinews) June 18, 2023
कर्नाटक चैंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज (KCC&I) ने बिजली शुल्कों में असामान्य मूल्य वृद्धि के विरोध में 22 जून को कर्नाटक बंद का आह्वान किया है: KCC&I pic.twitter.com/RfHpNms8mX
— ANI_HindiNews (@AHindinews) June 18, 2023
कर्नाटकात काँग्रेसने निवडून येण्यासाठी विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात केली. यात 200 युनिट पर्यंत सर्वांना वीज मोफत देण्याची घोषणा केली. ही घोषणा सिद्धरामय्या सरकारने अमलात आणली. पण त्याचवेळी 200 युनिटच्या पुढची वीज वापरणाऱ्यांसाठी दरवाढ केली. त्याचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवरच टाकला. त्यामुळे आता नागरिक तर बेजार झालेच, पण औद्योगिक वीज विजेच्या दरात पण वाढ झाल्याने छोटे – मध्यम उद्योजक हैराण झाले वीज दरवाढीचा प्रतिकूल परिणाम थेट उत्पादनावर झाला.
त्यामुळे या वीज दरवाढीचा कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजने 22 जून 2023 रोजी बंद पुकारला आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येऊन एक महिना उलटतोय ना तोच काँग्रेसवर अशी नामुष्की आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App