प्रतिनिधी
जळगाव : महाराष्ट्रात महाविकास आघाडी अस्तित्वात असली तरी विरोधी भाजपशी लढण्यापेक्षा आघाडीतच मुख्यमंत्रीपदाची मोठी स्पर्धा लागली आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा जास्तच तीव्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या शिबिरात नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. Ajitdad’s ears in the party camp!
नुसताच मुख्यमंत्री झाले पाहिजे असं म्हणून कसं चालेल?, कसा व्हायचा मुख्यमंत्री?, त्यासाठी आमदार नको का निवडून आणायला?, धुळे आणि नंदुरबार मध्ये राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही आणि म्हणे मुख्यमंत्री व्हा!! कसा व्हायचा??, अशा परखड शब्दांमध्ये अजितदादांनी राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. अमळनेरमध्ये राष्ट्रवादीच्या शिबिरात ते बोलत होते.
फडणवीस यांच्या नेतृत्वगुणाची अजित दादांकडून स्तुती, पण युतीच्या गणिताची मात्र वजाबाकी
शिवसेना ( शिंदे गट ) नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी ‘अजित पवारांकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो,’ असे विधान केले. यावर अजित पवार यांनी मिश्कील टीप्पणी केली आहे.
अनिल पाटील म्हणाले, अजित पवार आता विरोधी पक्षनेते आहेत. पण, येणाऱ्या काळात आम्ही भावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादांकडेच पाहतो.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यातील जनतेला चांगले दिवस दाखवायचे आहेत, त्यासाठी राष्ट्रवादीचे जास्तीत-जास्त आमदार निवडून आणायला पाहिजेत. मी काल धुळ्याला आणि नंदूरबारला होतो. तिथे एकही राष्ट्रवादीचा आमदार नाही. जळगावात एकच आमदार निवडून आला. साहेबराव होते, तेव्हा 6 आमदार होते आणि आता एकच आमदार आहे. हे कसं चालायचं? कसा आपला मुख्यमंत्री व्हायच? नुसतं मुख्यमंत्री झालाच पाहिजे… अरं कशाचा झाला पाहिजे…!! मी माझ्या जिल्ह्यातून १० आमदार निवडून आणणार… हे आधी म्हणा. आता वर्षभराहून अधिक काळ आपल्या हातात आहे. त्यामुळे आधी जास्त आमदार निवडून आणायचा विचार करा, असे उद्गार अजितदादांनी काढून नेते आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App