विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत तीन मूर्ती भवन आणि त्यामागे मोदी सरकारनेच बांधलेले पंतप्रधान संग्रहालय या सर्व संकुलाला आता “प्राईम मिनिस्टर्स मेमोरियल” असे नाव दिले आहे. त्यातून नेहरूंचे नाव बाजूला काढले आहे. पण काँग्रेसने या मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष करत केवळ नेहरूंचे नाव वगळले म्हणून मोदींवर सूडबुद्धीची टीका केली आहे.Modi government shows every prime minister’s contribution, but Congress dig at only renaming issue
याचे कथानक असे :
राजधानीतील तीन मूर्ती भवन मध्ये पंतप्रधान नेहरूंचे अखेरपर्यंत वास्तव्य होते. तेथेच नेहरूंच्या मृत्यूनंतर नेहरू मेमोरियल ट्रस्ट स्थापून काँग्रेस सरकारने नेहरूंच्या वस्तू जतन केल्या त्याचे लोकार्पण तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केले. नेहरूंच्या स्मृती त्यानंतरच्या सर्व सरकारांनी जपल्या. पण नंतरच्या काळात अनेक पंतप्रधान झाले. आता तिथल्या संग्रहालयात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांच्या संदर्भातल्या सर्व स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने त्या स्मृती भवनाचे नामकरण “प्राईम मिनिस्टर मेमोरियल” असे केले आहे.
मात्र हा नवा संदर्भ लक्षात न घेता काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी नेहरूंचे नाव स्मृती संग्रहालयाच्या नावातून वगळले म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सूडबुद्धीची टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूडबुद्धीचे दुसरे नाव आहे. ते भारताच्या शिल्पकाराचा वारसा नष्ट करण्याचे काम करत आहेत. त्यांना बदनाम करत आहे आणि स्वतःचे कर्तृत्व छोटे असूनही स्वयंघोषित विश्वगुरू म्हणून जगभरात फिरत आहेत, अशा आशयाचे ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे.
मात्र, तीन मूर्ती भवन मधून पंतप्रधान नेहरूंच्या स्मृती वगळण्यात आलेल्या नाहीत. तेथे पंतप्रधान मोदी नेहरू ते पंतप्रधान मोदी या सर्वांच्या स्मृती जतन केल्या आहेत. पण काँग्रेसने या वास्तवाकडे दुर्लक्ष करून मोदींवर शरसंधान साधले आहे. प्राईम मिनिस्टरस मेमोरियल ट्रस्टवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष स्थानी आहेत. राजनाथ सिंह या ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत आणि अन्य काही केंद्रीय मंत्री ट्रस्टवर आहेत. या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांनी केलेल्या टीकेकडे पाहिले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App