पश्चिम बंगालच्या बांकुरामध्ये हिंसाचार, टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष

कारमध्ये आढळले मोठ्या प्रमाणात बॉम्ब, आठ जण ताब्यात

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पंचायत निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या काही भागात हिंसक संघर्ष निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत. याच पार्श्वभूमीवर बांकुरा येथे पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी करताना TMC आणि भाजपा समर्थक पुन्हा एकदा एकमेकांशी भिडले. Violence in West Bengals Bankura violent clashes between TMC and BJP workers

बांकुराच्या सोनामुखीमध्ये हा हिंसाचार झाला, ज्यात अनेक भाजपा कार्यकर्ते जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज भरताना तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. काही वेळातच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

त्याचवेळी, बांकुराच्या बिष्णुपूर भागात वाहन तपासणीदरम्यान एका कारमधून मोठ्या प्रमाणात बॉम्बही सापडले आहेत. पोलीस अधिकारी कुतुबुद्दीन खान यांनी सांगितले की, बांकुरा येथे वाहनांच्या तपासणीदरम्यान एका कारमधून बॉम्बने भरलेली बॅग सापडली. याप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

त्याच वेळी दक्षिण २४ परगनामधील कॅनिंगमध्ये ब्लॉकच्या बाहेर टीएमसीचे दोन गट एकमेकांशी भिडले. समर्थकांमध्ये हाणामारी झाली. पंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यावरून टीएमसीच्या दोन गटांमध्ये वाद झाला आहे. या हाणामारीत अनेक जण जखमी होण्याची शक्यता आहे.

Violence in West Bengals Bankura violent clashes between TMC and BJP workers

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात