लंडनमध्ये हैदराबादच्या तरुणीची चाकूने भोसकून हत्या, ब्राझिलियन व्यक्तीला अटक

पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी लंडनला गेली होती तरुणी

विशेष प्रतिनिधी

लंडन :  येथील वेम्बली येथून हैदराबादमधील 27 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 10 वाजता लंडनमध्ये एका 27 वर्षीय तरुणीवर ब्राझीलच्या नागरिकाने जीवघेणा हल्ला केला. Hyderabad girl stabbed to death in London Brazilian man arrested

कोंथम तेजस्विनी असे मृत तरूणीचे नाव आहे. वास्तविक, लंडनमध्ये उच्च शिक्षणासाठी आलेल्या तेजस्विनीचा हल्ल्यानंतर घटनास्थळीच मृत्यू झाला. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी एका २८ वर्षीय महिलेवरही हल्ला करण्यात आला आहे. जिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ती धोक्याबाहेर आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वेम्बलीच्या नील क्रेसेंट भागात राहणाऱ्या तेजस्विनी आणि तिच्या रूममेटवर एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला. मात्र, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी तेजस्विनीला मृत घोषित केले, तर तिच्या सहकारीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली.

हैदराबादमध्ये राहणारा तेजस्विनीचा चुलत भाऊ विजय याने सांगितले की, आरोपी ब्राझीलचा असून तो एका आठवड्यापेक्षा कमी काळापासून तेथे राहत होता. तेजस्विनी गेल्या वर्षी मार्चमध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी लंडनला गेली होती.

Hyderabad girl stabbed to death in London Brazilian man arrested

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात