वृत्तसंस्था
चेन्नई : एरवी केंद्र सरकारच्या ईडी, सीबीआय तपासणी त्यांना विरोध शड्डू ठोकणारे विरोधकांचे बडे बडे नेते प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई झाल्यानंतर कसे घायकुतीला येतात, याचे उदाहरण तामिळनाडू दिसले. तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांना मनी लॉन्ड्रीग प्रकरणात ईडीने अटकेची प्रतिक्रिया प्रक्रिया सुरू केल्याबरोबर ते ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर पडले अन् रड रड रडले!! त्यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली त्यामुळे ईडीच्या अधिकार्याने त्यांना अटक करून कायदेशीर प्रक्रियेद्वारे हॉस्पिटलमध्ये पोहोचवले.Earlier, Shaddu was struck against the central inspection system; Tamil Nadu Energy Minister Senthil Balaji burst into tears in ED arrest!!
त्याचे झाले असे :
मनी लॉन्ड्रीग प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सेंथिल बालाजी यांचे कार्यालय, वैयक्तिक निवासस्थान आणि त्यांच्याशी संबंधित अन्य काही ठिकाणांवर एकाच वेळी छापे घातले. हे छापे सुरू होताच सेंथिल बालाजी यांचे धाबे दणाणले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटकेची प्रक्रिया सुरू करायला सुरूवात केल्याबरोबर त्यांनी रडायला सुरुवात केली.
ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर सेंथिल बालाजी पडले. त्यांनी आधी आरडाओरडा करून नंतर रडा रड ड्रामा सुरू केला.
त्याआधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी असेच छापे घातले, तेव्हा सेंथिल बालाजी यांचे भाऊ अशोक कुमार यांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांच्या सकट त्यांच्या समर्थकांना अटक केली. त्यामुळे आधीच सेंथिल बालाजी यांची प्रचंड चिडचिड झाली होती. त्यातून मनी लॉन्ड्रीग प्रकरणात स्वतःवरच बेतली, तेव्हा तर हद्द झाली. सेंथिल बालाजी अधिकाऱ्यांसमोर रडायला लागले. अधिकाऱ्यांनी त्यांना अटक करून गाडीत बसवताच, ते गाडीतच लोळले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. बालाजी यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवले.
https://twitter.com/ANI/status/1668737885242286080?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1668737885242286080%7Ctwgr%5E29f4e35f104dd7465654d58547b61139a0ca41e5%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-7713531503861480242.ampproject.net%2F2305252018001%2Fframe.html
आता सर्व विरोधी पक्षांनी पत्रके काढून सेंथिल बालाजी यांच्या अटकेचा निषेध केला आहे. यात मल्लिकार्जुन खर्गे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टालिन यांचा समावेश आहे. स्टालिन यांनी त्यांच्या दोन-तीन मंत्र्यांना ताबडतोब बालाजींना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले.
पण यातून एक बाब उघड झाली, ती म्हणजे एरवी ईडी – सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात शड्डू ठोकून जोरजोरात बोलणारे नेते, प्रत्यक्ष कायदेशीर कारवाईच्या कसोटीला सामोरे जाताना कसे भेदरतात आणि ती कारवाई टाळण्यासाठी आदळ आपट, रडा रड करून कसा राजकीय ड्रामा करतात हे स्पष्ट झाले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App