जनतेच्या मनात मी आणि देवेंद्रच आहोत, हे पहा ना!!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विरोधकांना खोचक प्रत्युत्तर

प्रतिनिधी

मुंबई : जाहिरात शिवसेनेची, सर्वेक्षणात बहुमत शिवसेना-भाजप युतीला, पण जाहिरातीवरून शिवसेना-भाजपमध्ये कथित मतभेद असल्याच्या राष्ट्रवादीला आनंदाच्या उकळ्या कुठल्या असल्या तरी मुख्यमंत्री यांनी मात्र त्यांना आणि बाकीच्या विरोधकांना खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात मी आणि देवेंद्र फडणवीस हेच आहोत आहोत याकडे पहा ना, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला आहे. Maharashtra mandate is with me and devendra fadnavis, says chief minister eknath shinde

महाराष्ट्रात आता निवडणुका झाल्या तर शिवसेना-भाजप युतीला 165 ते 185 जागा मिळून पूर्ण बहुमत मिळेल असे झी न्यूजच्या सर्वेक्षणात नमूद केले आहे. त्यावरून शिवसेनेने आज सर्व वर्तमानपत्रांच्या फ्रंट पेजवर जाहिरात दिल्या. राष्ट्रात मोदी, महाराष्ट्र शिंदे असे या जाहिरातीत म्हटले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांपेक्षा तीन टक्के मते जास्त मिळाली. त्यावरून राष्ट्रवादीने भाजपची खेचली आहे.



राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपने एकनाथ शिंदेंकडेच नेतृत्व द्यावे असा खोचक सल्ला दिला, तर भाजपच्या 105 आमदारांमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर शिवसेनेच्या 40 आमदारांमुळे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, असा टोला अजित पवारांनी लगावला.

शिवसेना आणि भाजप युतीला 46% मते सर्वेक्षणातून मिळाली आहेत. त्या उलट संपूर्ण महाविकास आघाडीला 35 टक्क्यांच्या आत मते मिळून फक्त 118 जागा मिळण्याची शक्यता दाखविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 11 % मते मिळाली, असे दाखविले आहे. अशा स्थितीतही राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवसेना – भाजप मधल्या कथित मतभेदांच्या आनंदाचा उकळ्या फुटल्या आहेत. स्वतःच्या पक्षाला फक्त 11 % मिळत आहेत, याकडे राष्ट्रवादीचे नेते सोयीस्कर काणाडोळा करत आहेत.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वेक्षणातल्या मूळ निरीक्षणाकडे लक्षवेधी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात मी आणि देवेंद्र फडणवीस हे दोनच नेते आहोत. बाकीचे कोणी आसपासही दिसत नाहीत. कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे जनतेच्या मनातले सरकार स्थापन केले. पैशासाठी आणि खंडणीसाठी आणि एकत्र आलेलो नाही. केवळ सत्तेसाठी तर बिलकुल एकत्र आलो नाही. आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो आणि याची पक्की जाणीव जनतेला असल्याने जनतेच्या मनात मी आणि देवेंद्र फडणवीस हे दोनच नेते आहेत, अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचे वाभाडे काढले.

Maharashtra mandate is with me and devendra fadnavis, says chief minister eknath shinde

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात