नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या रौप्य महोत्सवी त्यांच्याच भाषेत भाकरी फिरवून खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष नेमले. सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांच्याकडेही सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवून त्यांचे प्रमोशन केले. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेबसाईटवर मात्र शरद पवारांचा उल्लेख “हमारे राष्ट्रपति” असा आहे. पक्षाध्यक्ष पदाचे ते हिंदी भाषांतर आहे!! NCP@25 : sharad pawar “hamare rashtrapati”; but does party constitution has provisions of working presidents??
वास्तविक 2022 मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार हेच सर्व विरोधी पक्षांचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. पण शरद पवारांनी विरोधी पक्षांच्या पहिल्या पसंतीची ही ऑफर नाकारली होती. आपण सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहणारे नेते आहोत. राष्ट्रपती भवनातून आपला जनसामान्यांशी संपर्क राहणार नाही, असे त्यांनी त्यावेळी कारण दिले होते.
वास्तविक भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात आपण निवडूनच येणार नाही कारण भाजपकडे प्रचंड बहुमत आहे, याची खात्री पवारांना खात्री होती त्यामुळेच त्यांनी राष्ट्रपती पदाची उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांच्या गळ्यात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा हार घातला. पण त्यांना निवडणुकीत हार पत्करावी लागली होती.
शरद पवारांच्या जीवनात प्रत्यक्ष राष्ट्रपतीपदाचा राजकीय योग नसला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेबसाईटवर मात्र शरद पवारांचा उल्लेख “हमारे राष्ट्रपति” असा आजही कायम आहे.
राष्ट्रवादीची पक्ष घटना
त्या पलीकडे जाऊन सध्या सोशल मीडियातून एक प्रश्न उपस्थित केला जातो आहे, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष घटनेत कार्यकारी अध्यक्ष पद असे कोणते पद अस्तित्वात आहे का?? आणि असे पद अस्तित्वात नसेल, तर प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या कार्यकारी अध्यक्षपदावरील नियुक्त्या निवडणूक आयोगाच्या कायदेशीर कसोटीवर उतरतील का?? हे प्रश्न आता विचारले जात आहेत.
शिवसेनेतला उद्धव ठाकरे पेच
उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्यकारी कार्य प्रमुख म्हणून नेमलेच होते. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना प्रमुख एकच असेल, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे, त्यामुळे स्वतःकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख पद घेतले होते. पण दरम्यानच्या काळात त्यांनी शिवसेना पक्षाची घटना दुरुस्ती केली नव्हती. त्यामुळे आता तो वाद निवडणूक आयोग ते सुप्रीम कोर्ट असा फिरतो आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष घटनेत कार्यकारी अध्यक्ष पद अस्तित्वात आहे का??, असा प्रश्न तयार झाला आहे.
त्याच वेळी एक महत्त्वाचा संदर्भ देणे इथे आवश्यक आहे, तो म्हणजे शरद पवारांनी 10 जून 1999 रोजी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती, त्यावेळी त्यांच्याच तोलामोलाचे पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर हे दोन बडे नेते त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांची नियुक्ती शरद पवारांनी कार्यकारी अध्यक्षपदी केलेली नव्हती. त्यावेळेपासून शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. आता पी. ए. संगम हयात नाहीत, तर तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडून काँग्रेस पक्षात गेले आहेत.
आता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पंचविशीत प्रवेश करते आहे, तेव्हा शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. ती पक्ष घटनेनुसार आहे का?? निवडणूक आयोगाच्या कायदेशीर कसोटीवर या नियुक्त्या टिकतील का?? असे सवाल उपस्थित होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App