‘’चहा पिऊन, पत्रकार परिषद घेऊन विरोधक मजबूत झाले असते, तर…’’

Prashant kishor and nitish kumar new

 प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांना लगावला टोला

विशेष प्रतिनिधी

पाटणा : 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे अनेक विरोधी  पक्ष एकजुट करण्यात गुंतले आहेत. दरम्यान, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी विरोधी एकजुटीसाठी होत असलेल्या प्रयत्नांवर टोला लगावला आहे. ’’ चहा पिऊन, पत्रकार परिषद घेऊन विरोधक जर मजबूत झाले असते, तर २० वर्षांपूर्वीच ते मजबूत झाले असते.’’ असं ते म्हणाले आहेत. Prashant Kishor criticizes Nitish Kumar

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. यावर प्रशांत किशोर यांनी राजकीय हल्ला चढवत नितीशकुमारांनी बिहारची चिंता करावी, असे म्हटले आहे.

नितीश यांनी ममता, अखिलेश यांची घेतली भेट –

प्रशांत किशोर म्हणाले की, ज्या पक्षाला स्वत:चा आधार नाही, तो पक्ष संपूर्ण देशातील विविध पक्षांना एकत्र करण्यात मग्न आहे. आज राजदचे शून्य खासदार आहेत आणि ते देशाचा पंतप्रधान ठरवत आहेत. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्यासाठी लालू आणि नितीश कुमार यांना जागा देण्याचे मान्य केले आहे का? लालू आणि नितीश यांनी बिहारमध्ये टीएमसीला एकही जागा देण्याचे मान्य केले आहे का?

याशिवाय प्रशांत किशोर म्हणाले की, नितीशकुमार यांना कोण विचारतय ते नुकतेच उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांना भेटायला गेले होते. अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 5 जागा आणि 2019 मध्ये 5 जागा मिळाल्या, पण ते 500 खासदार असल्यासारखे बोलत आहेत.

Prashant Kishor criticizes Nitish Kumar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात