आणखी एक मुख्यमंत्री पोस्टर वर चढले. भंडारा जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी पोस्टर लावले आणि त्यांना भावी मुख्यमंत्री ठरवून टाकले. त्यामुळे आता महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री यांची संख्या नेमकी किती आहे हे सहज मोजून समजणार नाही, अशी स्थिती आली आहे. कारण काँग्रेस – राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराला आणि त्यांच्या समर्थकांना भावी मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडत आहेत. Future chief minister posters is like a black comedy of poster boys cinema
नाना हे काही पोस्टरवर चढवलेले एकमेव मुख्यमंत्री नव्हेत. त्या आधी राष्ट्रवादीने जयंत पाटील, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे यांना पोस्टर्सवरचे मुख्यमंत्री केलेच आहे. त्या पाठोपाठ काँग्रेस मागे राहायला नको म्हणून नानांच्या समर्थकांनी त्यांचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर लावले आहे.
पण पोस्टर्सवरच्या या मुख्यमंत्र्यांची यादी पाहून पोस्टर बॉईज सिनेमाची कथा आठवली. बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपदेने निर्माण केलेला सिनेमा पोस्टर बॉईज महाराष्ट्रात गाजला होता. त्याचे हिंदी रूपांतर सनी देओल आणि बॉबी देओल या भावंडांनी पण केले होते. काय होती त्या पोस्टर बॉईज सिनेमाची कथा?? गावातल्या तीन व्यक्ती, वेगवेगळ्या वयोगटातल्या. पण त्यांच्या परवानगीशिवाय त्यांची पोस्टर्स गावात लागली आणि त्यांची गावात टिंगल टवाळी सुरू झाली. कारण जी पोस्टर्स गावात लागली होती, ती होती नसबंदीची आणि ज्यांची पोस्टर्स लागली होती त्यांनी नसबंदी केलीच नव्हती आणि म्हणून त्यांची गावात तुफान टिंगल टवाळी झाली. त्यातून मोठे हास्य निर्माण झाले आणि तो सिनेमा गाजला. एक गंभीर विषय श्रेयस तळपदेने ब्लॅक कॉमेडी रुपात सादर केला होता.
महाराष्ट्रात पोस्टर्सवरच्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून अशीच ब्लॅक कॉमेडी तयार झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सत्ता मिळवण्यासाठी एवढे उतावीळ झाले आहेत की जनतेने प्रत्यक्ष मतदान करून पक्षाला बहुमत दिल्यानंतर कोणा एकालाच मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे, हे जवळपास ते विसरूनच गेले आहेत. कधी निवडणूक होतीय आणि आपण कधी खुर्चीवर जाऊन बसतोय, असे त्यांना झाले आहे. निवडणूकीतले नुसते मतदान झाले की आपण मुख्यमंत्री झालो, अशा थाटात नेते वावरत आहेत. या नेत्यांच्या वर्तणुकीचे प्रतिबिंब कार्यकर्त्यांमध्ये पडते. त्यामुळे कार्यकर्तेही उत्साहात येऊन नेत्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावत आहेत.
पण या भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टर्सची कथा आणि पोस्टर बॉईजची व्यथा यात फारसे अंतर नाही, ही वस्तुस्थिती आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App