प्रतिनिधी
नाशिक : संजय राऊत नाशकात आले, थुंकण्याचे समर्थन केले आणि तिकडे नाशिक जिल्ह्यातील सुरगण्यातले नगराध्यक्ष आणि नगरसेवक शिंदे गटात पोहोचले. Mayor, councilors of Raganet reached the Shinde group
नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊ चौधरी यांचा हा ठाकरे गटाला जोरदार धक्का मानला जात आहे.
संजय राऊतांवर आरोप
सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताना या नगरसेवकांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या वाचाळ वृत्तीस कंटाळून आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतला असं या नगरसेवकांनी म्हटलं आहे.
शिंदे गटात गेलेले नगरसेवक
नगराध्यक्ष भारत वाघमारे, सचिन आहेर नगरसेवक (गटनेता), नगरसेवक भगवान आहेर, पुष्पाताई वाघमारे, अरुणाताई वाघमारे, प्रमिलाताई वाघमारे, दिनेश वाघ, विलास गोसावी, चारोस्कर, गौरव सोनवणे
मुंबईतील नगरसेवकांचा प्रवेश
2 दिवसांपूर्वी मुंबईतील 2 नगरसेवकांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App