काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणतात भारताने अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारावी; पंतप्रधानांचीही असावी फिक्स्ड टर्म

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाचे माजी अर्थमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नुकतेच भारताने अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारण्याचे समर्थन केले आहे. इंडिया टुडे समूहाद्वारे आयोजित काँक्लेव्हमध्ये त्यांनी असे मत मांडले. मुलाखतकर्त्यांनी त्यांना केंद्र सरकारच्या विविध भूमिकांवर प्रतिक्रिया विचारली होती. Congress leader P. Chidambaram says India should adopt presidential system like US

पी. चिदंबरम म्हणाले की, भारताने खरे तर अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत स्वीकारली पाहिजे, ज्यात पंतप्रधानांचीही अमेरिकेसारखी दोन टर्मची अट असेल. मुलाखत घेणारे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून लोकांना यासंबंधीचे मत मागितले आहे.

आणखी काय म्हणाले चिदंबरम?

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या कारभारावर, राहुल गांधींचे मुस्लिम लीगबाबत केलेले वक्तव्य आणि नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधकांनी टाकलेला बहिष्कार यावर भाष्य केले.

यादरम्यान चिदंबरम यांना राहुल गांधींच्या अमेरिकेतील मुस्लिम लीगबाबतच्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यांनी केरळ आणि तामिळनाडूमधील मुस्लीम लीगच्या रचनेविषयी मला माहिती आहे, असे स्पष्ट केले. इंडियन युनियन मुस्लिम लीगचे (IUML) तामिळनाडूतील अनेक नेते मला ओळखतात. ते पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहेत. मला परदेशातील मुस्लिम लीगची माहिती नाही.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधकांनी बहिष्कार का टाकला? या प्रश्नावर ते म्हणाले की, 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले. मात्र त्यावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण का पाठवले नाही, असा सवाल चिदंबरम यांनी केला. संसदेत राष्ट्रपती आणि दोन्ही सभागृहे असतात असे घटनेत म्हटले आहे, मग राष्ट्रपतींना निमंत्रण का पाठवले नाही?

नुकताच केंद्र सरकारने अध्यादेश जारी करून न्यायालयाचा तो आदेश मोडीत काढला, ज्यामध्ये दिल्लीत मुख्यमंत्र्यांना बॉस मानले जात नव्हते. या अध्यादेशाबाबत केंद्राच्या विरोधात काँग्रेस केजरीवाल यांना पाठिंबा देणार का, असा सवाल केला. यावर ते म्हणाले की, मी पक्षाच्या व्यासपीठावरच यावर माझे मत मांडले आहे. मी या मंचावर टिप्पणी करणार नाही. मी अजूनही काँग्रेसचाच आहे. दिल्ली अध्यादेशाच्या वादावर काँग्रेस पक्षाची भूमिका मी नाही तर अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ठरवणार आहेत.

सीबीआय, ईडीची 95 टक्के कारवाई विरोधी पक्षांवरच का?

देशात अनेकवेळा केंद्र सरकारवर सीबीआय आणि ईडीसारख्या एजन्सींचा गैरवापर केल्याचा आरोप झाला आहे. अशा स्थितीत चिदंबरम म्हणाले की, हे विचारपूर्वक केलेल्या रणनीतीनुसार घडते. विरोधी पक्षांना लक्ष्य केले जाते. असे होत नसते तर 95 टक्के केवळ विरोधी पक्ष आणि त्यांच्या सदस्यांवरच सीबीआय आणि ईडीची कारवाई का होत आहे? आणि तसे झाले नसते तर भाजपचे खासदार, भाजप आमदार आणि भाजप नेत्यांवरही छापे टाकण्यात आले असते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर योग्य नाही. त्यामुळे भविष्यात मोठा विध्वंस होऊ शकतो, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे.

Congress leader P. Chidambaram says India should adopt presidential system like US

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात