प्रतिनिधी
मुंबई : एसटीमधील प्रवासी आणि वाहक यांच्यामध्ये सुट्या पैशावरून होणारा वाद लवकरच संपुष्टात येणार आहे. येत्या १५ जूनपर्यंत राज्यभरातील ३५ हजार कंडक्टरांना ३८ हजार ५०० अँड्रॉइड तिकीट मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना पुढील काळात गुगल पे, कार्ड पेमेंट, फोनपे यांसारख्या डिजिटल पद्धतीने सहज तिकीट काढता येणार आहे.ST Conductor – Holidays between passengers end disputes over money; Booking from Android ticket machine soon!!
एसटी महामंडळात अनेक नावीन्यपूर्ण बदल होत आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत अशा सुविधांनी एसटी महामंडळ उभारी घेत आहे. यामध्ये आणखी भर म्हणजे रखडलेल्या अँड्रॉइड तिकीट मशिनचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटीचा प्रवास करताना सुट्या पैशांसाठी वाहक व प्रवासी यांच्यात नेहमीच वाद होतात. ही समस्या सोडवण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने अँड्रॉइड मशीन देण्याचे नियोजन केले आहे. मशीनमुळे प्रवाशांना तिकिटाची रक्कम थेट ऑनलाइन देता येणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून विनावाद एसटी प्रवास सुलभ होणार आहे.
मुंबई, ठाण्याला मशिन्स प्राप्त
प्रायोगिक तत्त्वावर मुंबई आणि ठाणे विभागाला २ हजार ५०० मशिन्स प्राप्त झाल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत मुंबई- ठाण्यातील एसटी वाहक प्रत्यक्षपणे या नव्या मशीनचा वापर करणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App