स्मृती इराणींचा काँग्रेसवर पलटवार : मी अमेठीतच आहे, माजी खासदारांना शोधायचे असेल तर अमेरिकेत पाहा..!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेस नेत्यांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले आहे. बुधवारी (31 मे) काँग्रेसने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा फोटो ट्विट केला आणि त्यावर मिसिंग लिहिले. आता केंद्रीय मंत्र्यांच्या बाजूनेही यावर पलटवार करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.Smriti Irani’s attack on Congress I am in Amethi, if you want to find former MPs, look in America..!

स्मृती इराणी यांनी ट्विट केले की, “हे दिव्य राजकीय प्राणी, मी नुकतेच अमेठी लोकसभेच्या सलून विधानसभा मतदारसंघातील सिरसिरा गावातून निघाले असून धुरनपूरकडे जात आहे. तुम्ही माजी खासदारांना शोधत असल्यास, कृपया अमेरिकेशी संपर्क साधा.” अमेठीचे माजी खासदार राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी यांच्याकडून पराभव झाला होता.



काँग्रेस नेत्याचा पंतप्रधानांवर निशाणा

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल गांधींनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “भारतात असा एक गट आहे ज्यांना पूर्ण खात्री आहे की त्यांना सर्व काही माहिती आहे. त्यांना वाटते की, ते देवापेक्षा जास्त जाणतात. युद्ध कसे लढायचे ते सैन्याला सांगू शकतात.”

कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा मुद्दा

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या ट्विटवर काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या फोटोसह ट्विट केले, “अहो मॅडम, आपल्या कुस्तीपटू मुली तुम्हाला शोधत आहेत. स्मृती इराणी त्यांना भेट द्या.”

देशातील प्रसिद्ध कुस्तीपटू हे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. मंगळवारी कुस्तीपटूही हरिद्वारमधील गंगा नदीवर जाऊन पदके प्रवाहित करण्याची घोषणा केली होती. मात्र, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी समजूत घातल्यावर त्यांनी पदके पाण्यात सोडली नाहीत. टिकैत यांनी कुस्तीपटूंकडे 5 दिवसांची वेळ मागितली होती.

Smriti Irani’s attack on Congress I am in Amethi, if you want to find former MPs, look in America..!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात