प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणदीप फक्त अभिनयच करत नाहीये, तर त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. अलीकडेच, चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी खुलासा केला की, चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे दिसण्यासाठी रणदीप हुडाने 26 किलो वजन कमी केले आहे.Much Awaited Movie ‘Swatantrya Veer Savarkar’ Teaser Released, Actor Randeep Hooda Loses 26 Kgs in 4 Months, Reveals Makers
सावरकरांवर चित्रपट काढण्याची कल्पना कशी सुचली?
ETimes शी केलेल्या संवादात आनंद पंडित यांनी सांगितले की, त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानतात. सावरकर हे राजकारणाचे बळी ठरले होते, त्यांना त्यांचा हक्क मिळाला नाही. एके दिवशी संदीप सिंह रणदीप हुड्डासोबत त्यांच्या ऑफिसमध्ये आला आणि त्यांना त्यावर चित्रपट बनवण्याची कल्पना दिली. यासोबतच असंही म्हटलं की, त्यांना योग्य वाटलं तर ते निर्माते म्हणून चित्रपटात येऊ शकतात. मग काय, चर्चा झाली आणि लगेच चित्रपट बनवण्याचा निर्णयही झाला.
रणदीप हुड्डाने 4 महिने फक्त खजूर आणि दूध घेतले
जेव्हा आनंद पंडित यांना विचारण्यात आले की मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणदीप हुडाने या चित्रपटासाठी 18 किलो वजन कमी केले आहे. तेव्हा आनंद म्हणाले की, ’18 नाही, या भूमिकेसाठी त्याने 26 किलो वजन कमी केले आहे. जेव्हा तो माझ्या ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याचे वजन 86 किलो होते. त्या दिवसापासून तो या व्यक्तिरेखेत उतरू लागला आणि आजतागायत तसाच आहे. त्याला कोणतीही कसर सोडायची नव्हती. त्याने 4 महिने फक्त एक खजूर आणि एक ग्लास दूध प्यायले. शूटिंग संपेपर्यंत हेच. एवढेच नाही, लूक जुळावा म्हणून त्याने ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे केस नव्हते त्याच ठिकाणचे केसही काढले.
रणदीप हुड्डानी घेतली सावरकरांच्या वंशजांची भेट
आनंद पंडित पुढे म्हणाले, ‘रणदीप हुड्डा यांनी कोणतेही प्रोस्थेटिक वापरले नाही. आम्ही महाबळेश्वर जवळच्या गावात शूटिंग केलं. माझ्याकडे येण्यापूर्वी रणदीपने या सिनेमासाठी सावरकरांच्या नातवाकडून परवानगी घेतली होती, पण परवानगीची गरज होती असे मला वाटत नाही. कारण सर्व माहिती पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. उद्या गांधीजींवर चित्रपट काढला, तर परवानगी लागणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App