सकाळपासून हवन, पूजनाचा कार्यक्रम सुरू होणार; आजचे संपूर्ण वेळापत्रक
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान नायक विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात झाला. वीर सावरकर यांची आज (२८ मे) जयंती आहे. सेंट्रल हॉलमध्ये सकाळी साडेदहा वाजता त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी भाजपाचे सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत. First a tribute to Veer Savarkar then PM Modis Mann Ki Baat and inauguration of the new Parliament House
यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रमही प्रसारित होणार आहे. सकाळी ११ वाजता वीर सावरकरांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सर्व भाजपा खासदार संसद भवनाच्या बालयोगी सभागृहात ‘मन की बात’ ऐकतील. भाजपाच्या सर्व खासदारांना सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
नवीन संसद भवनाचे उद्घाटन –
‘मन की बात’ कार्यक्रमानंतर लगेचच संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी खासदारांना सकाळी ११.४५ वाजेपर्यंत आपल्या आसनावर जाऊन बसावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १२ वाजता संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ७ वाजल्यापासून हवन, पूजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे.
दुपारी २ वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार –
सकाळी ७.३० ते ८.३० पर्यंत हवन व पूजा होईल. गांधी पुतळ्याजवळ पूजेसाठी मंडप उभारण्यात येणार आहे. यावेळी नाणे आणि शिक्क्याचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील आणि त्यासोबत ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील. दुपारी २ ते २.३० च्या सुमारास कार्यक्रम संपेल असे मानले जात आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून गदारोळ –
तर दुसरीकडे वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. उद्घाटन सोहळ्याची तारीख बदलण्यात यावी, अशी काँग्रेस सातत्याने मागणी करत आहे. यासोबतच विरोधी पक्षातील अनेक नेतेही पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटनाला विरोध करत असून त्यांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App