अवधुत गुप्तेंच्या ‘’खूपते तिथे गुप्ते’’ कार्यक्रमात आहे विशेष उपस्थिती, सर्वांनाच उत्सुकता
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजही असा एक मतदार वर्ग आहे. ज्या वर्गाला राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं हे कायम वाटत आल आहे. त्या वर्गाची ही प्रामाणिक इच्छा लक्षात घेता. ज्या ज्यावेळी संधी मिळते त्या त्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना हा प्रश्न कायम विचारला जातो आणि त्या वेळी भावनिक बंधुत्वाच्या नात्याची आठवण करून दिली जाते. Raj Thackeray is emotional in Avadhoot Gupte’s Khupte there Gupte program
आत्ताही असंच काहीसं झालंय. झी मराठी वाहिनीवरील बहुचर्चित आणि लोकप्रिय कार्यक्रम खूपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा तिसरा सिझन ४ जून रोजी येऊ घातला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या विशेष भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. राज ठाकरे आता यांना नेमकं काय खुपतय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अवधूत गुप्ते आपल्या खुमासदार शैलीत राज ठाकरे यांना कशाप्रकारे बोलत करतात ते बघणं महत्त्वाच असणार आहे.
View this post on Instagram A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
या कार्यक्रमाचे दोन-तीन प्रोमो झी मराठी वरून प्रसारित करण्यात आले आहेत. त्यापैकी एका प्रोमोमध्ये राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सोबतचे काही जुने फोटो दाखवण्यात आले. हे बघून कसं वाटतंय असं अवधूतनी राज ठाकरेंना विचारलं असता. खूप सुंदर दिवस होते ते काय माहित कोणी विष कालवलं? कोणाची नजर लागली? असं म्हणत काही क्षणांसाठी जुन्या आठवणीत रमत राज ठाकरे त्यावेळी भाऊक झालेले दिसले.
हा प्रोमो बघून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच चांगलीच ताणली आहे. अवधूत कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांना आपल्या नेहमीच्या शैलीत कशाप्रकारे बोलतं करतो आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना अभिनेत्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना नेमकं काय काय खुपतं ते या कार्यक्रमातून बघायला मिळणार आहे. गेल्या दोन पर्वाप्रमाणेच हे पर्व देखील चांगलंच गाजणार असं दिसतं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App