तिहार तुरुंगात कैद्याची गळफास लावून आत्महत्या; दरोड्याच्या गुन्ह्यात भोगत होता शिक्षा!

मालवीय नगरमधील एका दरोड्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते.

विशेष प्रतिनिधी

दिल्ली :  दिल्लीतील तिहार तुरुंगात एका कैद्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. २०१६मध्ये, त्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयाने दिल्लीच्या मालवीय नगरमधील एका दरोड्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. An inmate allegedly died by suicide by hanging himself at Tihar Jail in Delhi

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शिवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कैद्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. जावेद (२६) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,कैदी जावेदला अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२ (FTC) दक्षिण यांनी दोषी ठरवले होते. यानंतर त्याला मध्यवर्ती कारागृह क्रमांक 8/9 येथे आणण्यात आले. सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या परिसरात त्याने ळफास घेऊन आत्महत्या केली.

तुरुंगात बंदिस्त गुंड टिल्लू ताजपुरियाच्या हत्येच्या तपासादरम्यान आत्महत्येची ही घटना घडली आहे. दिल्लीतील रोहिणी कोर्ट गोळीबार प्रकरणातील आरोपी गँगस्टर ताजपुरिया याची २ मे रोजी तिहार तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांनी हत्या केली होती.

An inmate allegedly died by suicide by hanging himself at Tihar Jail in Delhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात