नव्या संसदेचे सावरकर जयंती दिनी उद्घाटन; पण मोदी उद्घाटक म्हणून संजय राऊतांची विरोधकांच्या बहिष्काराची भाषा!!

प्रतिनिधी

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात नव्या संसदेचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती दिनी 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मात्र या संसदेच्या उद्घाटन समारंभावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने विरोधकांच्या बहिष्काराची भाषा सुरू केली आहे. Sanjay Raut used language of boycott of new parliament inauguration

नव्या संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याने काँग्रेस नेत्यांनी त्यांना आधीच विरोध सुरू केला आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी एकेका दिवसाच्या अंतराने ट्विट करून राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या संसदेचे उद्घाटन व्हावे, अशी मागणी केली आहे. पण काँग्रेसने उद्घाटन समारंभावर बहिष्काराची भाषा वापरलेली नाही, तर बहिष्काराची भाषा आता संजय राऊत यांनी वापरली आहे.


पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राहुल गांधींचा विरोध!!


राष्ट्रपती हे देशाच्या लोकशाहीचे संरक्षक अर्थात कस्टोडियन असतात. नव्या संसदेचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते व्हायला पाहिजे अशी भूमिका मांडताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर आगपाखड केली आहे. नव्या संसदेची गरज नसताना त्यांच्या राजकीय हट्टापायी नवी संसद बांधली. आपण नवी संसद बांधली. नवी राजधानी बांधली, असे मोदींना मिरवायचे आहे म्हणूनच त्यांनी राष्ट्रपतींना निमंत्रण दिलेले नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

पण एरवी आपले हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे, असा दावा करणाऱ्या संजय राऊत यांनी सावरकर जयंतीच्या दिवशी होणाऱ्या संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्काराची भाषा वापरली आहे.

Sanjay Raut used language of boycott of new parliament inauguration

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात