पवारांचे “लोक माझे सांगाती” वाचत फडणवीसांनी काढले ठाकरेंचे वाभाडे!!

प्रतिनिधी

पुणे : महाविकास आघाडीचा पोपट मेला याच्या पुढचे स्क्रिप्ट आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेश कार्यकारणीच्या विस्तारित बैठकीत वाचून दाखवले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या “लोक माझे सांगाती” या विस्तारित आत्मचरित्राचा आधार घेतला. किंबहुना फडणवीस यांनी “लोक माझे सांगाती” या पुस्तकाच्या पानांमधूनच पवारांची वाक्ये जशीच्या तशी वाचून दाखवत उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचे वाभाडे काढले. Devendra Fadanavis targets Uddhav Thackeray by reading sharad Pawar’s autobiography

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर संवादात सहजता असायची ती उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच्या संवादात नव्हती, उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याची खडान खडा माहिती हवी होती. पण ती त्यांच्याकडे नसायची, उद्धव ठाकरे केवळ दोन वेळा मंत्रालयात जाणे हे आमच्या पचनी पडणारे नव्हते, त्याउलट आमचे मंत्री अजित पवार, राजेश टोपे वगैरे नेते मंत्रालयातल्या कामकाजात आघाडीवर होते, अशा एकापाठोपाठ एका वाक्यांच्या फैरी पवारांनी उद्धव ठाकरेंवर झाडल्यात. त्या जशाच्या तशा देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखविल्या.

महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते असलेल्या शरद पवारांनी महाविकास आघाडीचा चेहरा असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या विषयी हे काय लिहिले ते वाचा, असे सांगून फडणवीसंनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठीची बोटे किती ढिल्ली आहेत, हेच दाखवून दिले.

त्याच वेळी शरद पवारांनी घडविलेल्या निवृत्ती नाट्यवर देखील फडणवीसांनी अचूक शब्दात बोट ठेवले. माझाच पक्ष, मीच माझ्या पक्षाकडे राजीनामा देणार, माझाच पक्ष माझा राजीनामा नाकारणार आणि मीच माझ्या आधीच्या खुर्चीवर जाऊन बसणार, हे नवीन नाटक महाराष्ट्राने पाहिले. पण शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा देतो असे फक्त सांगायचे असते प्रत्यक्ष द्यायचा नसतो, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले, असा टोला फडणवीसांनी पवारांना हाणला.

नेते आणि कार्यकर्त्यांकडून अपेक्षा

त्याच वेळी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना 2023 च्या पुढच्या 6 महिन्यांत आणि 2024 च्या पहिल्या 6 महिन्यांत अशा वर्षभराच्या कालावधीत काही मागू नका, तर पक्षासाठी त्याग करा, असे आवाहन केले. तुम्ही जो सांगाल तो त्याग करायला मी तयार आहे. तुम्ही पद सोडायला सांगितले, तर मी पदही सोडतो. घर सोडायला सांगितले तर वर्षभरासाठी घर सोडतो आणि पक्षासाठी काम करतो, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanavis targets Uddhav Thackeray by reading sharad Pawar’s autobiography

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात