पुरी-हावडा वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा, पुरी आणि कटक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पुरी-हावडा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. पुरी आणि कटक रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणीही ते करणार आहेत. याशिवाय 8 हजार कोटींहून अधिक किमतीचे रेल्वे प्रकल्पही जनतेला समर्पित केले जाणार आहेत. या सर्व कार्यक्रमात पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.PM Modi to flag off Puri-Howrah Vande Bharat Express, laying foundation stone for redevelopment project of Puri and Cuttack railway stations

दिल्लीत आंतरराष्ट्रीय म्युझियम एक्स्पोचे उद्घाटन

पंतप्रधान आज दिल्लीतील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जगभरातील सांस्कृतिक संस्था आणि संग्रहालये यांचे शिष्टमंडळदेखील उपस्थित राहणार आहेत.



नवीन वंदे भारत एक्सप्रेस, 500 किमीचे अंतर 6.5 तासांत कापणार

पुरी ते हावडादरम्यान ही वंदे भारत ट्रेन धावेल. ही ट्रेन ओडिशातील खोरधा, कटक, जाजपूर, भद्रक, बालासोर आणि पश्चिम बंगालच्या पश्चिम आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातून जाईल. 500 किलोमीटरचा हा प्रवास ट्रेन 6.5 तासांत पूर्ण करेल. दुपारी 1 वाजता पंतप्रधान ट्रेनला व्हर्च्युअली हिरवा झेंडा दाखवतील. यादरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव पुरी स्थानकावर उपस्थित राहणार आहेत.

पुरी आणि कटकच्या नवीन स्थानकांमध्ये आधुनिक सुविधा

पुरी आणि कटकमध्ये बांधल्या जाणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकांमध्ये सर्व आधुनिक सुविधा असतील. PMO नुसार, प्रवाशांना येथे जागतिक दर्जाचा अनुभव मिळेल. दुसरीकडे, पंतप्रधान ओडिशातील रेल्वे नेटवर्कचे 100 टक्के विद्युतीकरणदेखील समर्पित करतील. यामुळे ऑपरेटिंग आणि देखभाल खर्च कमी होईल. यासोबतच कच्च्या तेलावरील अवलंबित्वही कमी होईल.

पंतप्रधान मोदी या प्रकल्पांचे उद्घाटन करणार

अंगुल-सुकिंदादरम्यान नवीन ब्रॉडगेज लाईन
बिच्छुपाली आणि जरतारभा दरम्यान नवीन ब्रॉडगेज लाईन
मनोहरपूर-रौकरेला-झारसुगुडा-जामगा दरम्यानचा तिसरा रेल्वे मार्ग
संबलपूर-तितलागडदरम्यान दुसरा रेल्वे मार्ग

PM Modi to flag off Puri-Howrah Vande Bharat Express, laying foundation stone for redevelopment project of Puri and Cuttack railway stations

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात