विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांना विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाचे प्रकरण राज्यसभेच्या अध्यक्षांनी बुधवारी (17 मे) राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवले. महाराष्ट्र विधानसभेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांच्यावर विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं दिसत आहेत. Signs of increasing difficulties for Sanjay Raut
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी या प्रकरणाची शिफारस राज्यसभेच्या अध्यक्षांकडे केली होती. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर संजय राऊत म्हणाले होते की, हे विधान मंडळ नसून चोर मंडळ आहे.
विशेष म्हणजे जून 2022 मध्ये शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी इतर अनेक आमदारांसह बंडखोरी केली. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत युती करून सरकार स्थापन केले आणि ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळेच संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं होतं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App