अमेरिकन शिष्टमंडळाने राजदूत एरिक गारसेट्टींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट

अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृह येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.  महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. The American delegation led by Ambassador Eric Garcetti met Chief Minister Eknath Shinde

भारत – अमेरिका दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, संपर्क क्षेत्रात वाणिज्यिक संबंध आहेत. थेट परकीय गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर असून राज्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी असल्याचे याप्रसंगी अमेरिकेच्या शिष्टमंडळाला यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याशिवाय बदलते हवामान हे शेती क्षेत्रासमोर मोठे आवाहन असून त्यासाठी अमेरिकेने तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले. तसेच मुंबईत सुरू असलेले विविध प्रकल्प, महिला सक्षमीकरण, बचत गटांची चळवळ आदींबाबतही चर्चा झाली.

अमेरिकन शिष्टमंडळासाठी अल्पोपहारामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता. गारसेट्टी खवय्ये असल्याने अमेरिकन राजदूत यांना वडापाव खाण्याचा आग्रह केला. हा आग्रह स्वीकारत गारसेट्टी यांनी वडापाव खाल्ला आणि आवडल्याची प्रतिक्रियाही दिली.

The American delegation led by Ambassador Eric Garcetti met Chief Minister Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात